रेल्वे प्रवासी संघटनेचे रेल्वे महाप्रबंधक यांना "गोदावरी एक्सप्रेस" सुरू करण्यासाठी निवेदन .... मागणी पुर्णन झाल्यास आंदोलनाचा इशारा.
मनमाड : कोरोना विषाणूच्या प्रसारमुळे गेल्या अनेक महिन्यांपासुन मनमाड ते नाशिक ते मुंबई प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी आणि दररोज प्रवास करणारे पास धारक यांची जीवन वाहिनी असणारी 'मनमाड-कुर्ला गोदावरी एक्सप्रेस'बंद आहे. गोदावरी एक्सप्रेस ने दररोज मनमाडहुन नाशिक आणि मुंबई साठी हजारो नागरिक , विदयार्थी , कामगार वर्ग हे प्रवास करत असतात , परंतु गेल्या अनेक महिन्यापासून गोदावरी एक्सप्रेस बंद असल्याने या हजारो नगरिकांची खुप मोठी गैरसोय होत आहे. काही महिन्यांपासुन भारतीय रेल्वे कडुन अनेक रेल्वे गाड्या या कोरोना परिस्थितीचे नियम पाळून सुरू करण्यात आल्या , या गाड्यांप्रमाणेच मनमाड- कुर्ला गोदावरी एक्सप्रेस ही गाडी सुरू करण्यात यावी यासाठी आज मध्य रेल्वेचे महाप्रबंधक हे मनमाड येथे आले असता त्यांना रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्याचे निवेदन देण्यात आले. गोदावरी एक्सप्रेस चालू करण्यात यावी तसेच पासधारकांसाठी दुसऱ्या गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात यावी , गेल्या अनेक महिन्यापासुन रेल्वेच्या सर्व विभागांना गोदावरी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आले असुन आज पर्यंत त्याचा कुठल्याही प्रकारे सकारात्मक विचार झालेला नाही , अजूनही यावर काही होकारत्मक विचार न झाल्यास चाकरमान्यांकडुन तीव्र स्वरूपातील आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आलेला आहे. या प्रसंगी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र खैरे , उपाध्यक्ष संदिप व्यवहारे , ऍड ललीत आंबेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या