महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित मनमाड महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी Covid 19 लसीकरण मोहीम संपन्न.
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मनमाड येथे दिनांक 21 जाने.2022 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र संभाजी नगर, मनमाड. व राष्ट्रीय सेवा योजना मनमाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात लसीकरण मोहीम राबविण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण पाटील अध्यक्षस्थानी होते.आपल्या अध्यक्षीय मनोगतातून covid-19 संदर्भात प्रत्येकाने घ्यावयाची काळजी तसेच आपली जबाबदारी व लसीकरणाचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका श्रीमती शीतल मोरे यांनी लसीकरणाची गरज व लसीकरणाचे महत्व यासंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच त्यांचे सहकारी भारती बोडके (आशा सेविका) व मोनिष चाबुकस्वार (डाटा ऑपरेटर) हे लसीकरण मोहिमेसाठी उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.सी.डी. ठाकूर यांनी केले आभार प्रदर्शन प्रा.डी.आर.कातकाडे यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.पी.जी.आंबेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या ज्योती पालवे,पर्यवेक्षक व्ही. आर.फंड, शैक्षणिक पर्यवेक्षक डी. डी. हिरे.कार्यालयीन अधिक्षक श्री.समाधान केदारे उपस्थित होते. तसेच सदर लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या