Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय बालिका दिन साजरा.


  महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात २४ जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.व्ही.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींच्या सुरक्षिततेबाबत संवेदनशीलता आणि जनजागृती करण्यासाठी  तसेच मुलींना आत्मसंरक्षणाचे धडे मिळावे यासाठी कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. या शिबिरात क्रीडा शिक्षक   श्री. डी.पी. त्रिभुवन व त्यांच्या कराटेपटूंची ज्युडो कराटे तायक्वांदो, सिकाई मार्शल आर्ट,किक बॉक्सिंग  यासारख्या कराटे प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखवून, मुलींनी आत्मसंरक्षणासाठी याचा वापर कसा करावा   त्यासंदर्भातले मार्गदर्शन केले.


महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ पी जी आंबेकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महिला सबलीकरणसाठी असे उपक्रम स्तुत्य असतात असे सांगितले. यावेळी कराटे पटूंचा सत्कार तसेच सेल्फी विथ डॉटर असे उपक्रमही राबवण्यात आले. यावेळी  उपप्राचार्या  प्रा.  ज्योती पालवे, कुलसचिव श्री.समाधान केदारे, पर्यवेक्षक, डॉ सतीश तांबे,  प्रा. विठ्ठल फंड, महिला विकास कक्षाच्या कार्यक्रम अधिकारी सौ.कविता काखंडकी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ.दिनेश कराड, प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय  रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डॉ पी बी परदेशी तर आभार प्रा. वर्षाराणी पेढेकर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना,  महिला विकास कक्ष व शारीरिक शिक्षण विभाग यांच्यातर्फे करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या