प्रभाग क्र. २ मधील नागरिक नागरी सुविधा आणि मुलभूत नागरी गरजापासून वंचित. न.प. सार्वत्रिक निवडणुकीत मतदाना वर टाकणार बहिष्कार.
मनमाड प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
मनमाड : गेल्या १५ वर्षांपासून शहरातील प्रभाग क्र. २ मधील नागरिक नागरी सुविधा आणि मुलभूत नागरी गरजापासून वंचित ठेवले जात असून ह्या अन्याया विरोधात येणाऱ्या न.प. सार्वत्रिक निवडणुकीतील मतदाना वर आपण बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा प्रभागातील.
इम्रान अली शेख, सुनील कोलते, खालीद शेख, अब्दुल करीम शेख, जाहिद शेख, तौसीफ चाँद शेख आदि २५ मतदार नागरिकांनी निवडणूक आयुक्त, नगर विकास मंत्रालय, नासिक महसुल आयुक्त, जिल्हाधिकारी नासिक तसेच न.प. मुख्याधिकारी मनमाड यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिलेला आहे. प्रभाग २ मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट झालेली असून पाईपलाईन कमालीची बिघडलेली आहे. रस्ते सुस्थितीत नसून रस्त्यातील खड्ड्यांमुळे नागरिकांना विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड
हालअपेष्टा सोसाव्या लागत आहेत. गटारींची अत्यंत दैना झालेली असून स्वच्छतेअभावी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
यासंदर्भात वारंवार तक्रार निवेदने देऊनही न.प. कडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. एवढेच नव्हे तर आमदार साहेबांनी निधी उपलब्ध करुन दिलेला असूनही कोणतेही विकासाचे काम झालेले नाही. न.प. प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आम्ही कर भरणारे नागरिक न.प. प्रशासनाच्या निषेधार्थ न.प.ला कोणताही कर अदा करणार नाहीत. तसेच येणाऱ्या निवडणूकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा सदर निवेदनाद्वारे दिलेला आहे. निवेदनावर खालीक शेख, सुभाष साळवे, शकिल शेख, बुढन शेख, सलीम सर, अकबर शाह, इमरान कादरी, तैसीफ शेख, जावेद बेग, कलीम अन्सारी, शकील तांबोळी, रफिक शेख, नसीर तडवी, सिराज खान, रामदास पवार, नईम अन्सारी, विजय जगताप, चेतन उंबरे आदिंच्याही सह्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या