मनमाड.दीड महिन्यांपासून एस.टी. कर्मचाऱ्यांचा | संप सुरू असल्याने जनतेचे अतोनात हाल होत असून या संपावर तातडीने तोडगा काढून जनतेची आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मनमाडमधील नागरिक राजेंद्र धिंगान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
एस.टी. कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी संप पुकारला आहे. मात्र जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. ऐन सणांच्या दिवसात संप सुरू झाल्याने मोठा त्रास जनतेला झाला. अजूनपर्यंत संप सुरू असल्याने ग्रामिण भागातले दळणवळण ठप्प झाले आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार आदी सर्वांनाच या संपाचा त्रास सहन करावा लागत आहे. कामावर जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाचा आधार घ्यावा लागतो आहे. त्यामध्ये अनेक नोकरदार अपघातग्रस्त झाले आहेत. गोरगरीबांना जास्तीचे पैसे देवून गैरसोय सोसत प्रवास करावा लागत आहे. यामुळे खाजगी वाहनचालकांची मनमानी वाढली आहे. आता स्वतः मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घालून जनतेची गैरसोय टाळावी आणि नागरिकांची होणारी कुचंबणा दूर करावी . एस. टी. कर्मचाऱ्यांनाही न्याय द्यावा अशी मागणी धिंगान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या