अपंगांना मिळणाऱ्या सवलती प्रशासनाच्या निष्काळजीपणा मुळे फक्त कागदोपत्रीच !
प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
शासनाने अपंगांसाठी बऱ्याच सवलती जाहीर केल्या आहेत. जसे एसटी व रेल्वे प्रवासात सवलत, आयकर मध्ये सवलत (वास्तविक किती अपंग आयकर भरण्यास पात्र आहेत हा प्रश्न अलाहिदा) या सवलती मिळविण्यासाठी त्याला संबंधित कार्यालयाच्या किती हेलपाट्या खाव्या लागतात हे त्यालाच माहित. असो. प्रामुख्याने अपंगासाठी दिलेली एक सवलत, जी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे फक्त कागदोपत्रीच धूळ खात पडली आहे आणि ती म्हणजे अपंगाला बीपीएल कार्ड देणे. शासनाकडे ऑनलाईन अपंगांची यादी, मोबाईल नंबर, पत्ते सर्व काही असतांना प्रशासन त्यांचे रेशनकार्ड बीपीएल का करत नाही ? जो अपंग तहसील कार्यालयात जातो त्याला दुकानदारांकडे पाठविले जाते आणि जो दुकानदारांकडे जातो त्याला तहसील कार्यालयात पाठवले जाते. ही अपंगांची थट्टा नव्हे काय ? प्रशासनाने ठरवले तर या याद्यांवरून सर्व अपंगांना बीपीएल मध्ये समाविष्ट करण्यास काही वेळ लागणार नाही. पण तशी आमची दानत नाही. जणू काही अपंगांना सवलती मिळाल्या तर यांचे वेतन कमी होईल अशी भीती या प्रशासनाला वाटत असावी. सरकार मोठमोठ्याने आम्ही अपंगांना अशा सवलती दिल्या वगैरे फुशारकीने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतात. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, जे बीपीएल मध्ये बसत नाहीत त्यांना पिवळे कार्ड देवून अनेक सवलती दिल्या जात आहेत, खरे गरजवंत मात्र या सवलतीपासून वंचित आहेत. शासनाने प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पुरून उरेल इतके वेतन देवू केले आहे. परंतु माणुसकी या नात्याने, पुण्य मिळेल याचा विचार करून ही सवलत (मार्ग असतांना) का दिली जात नाही ? कारण काय, तर यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘वरची’ कमाई मिळणार नाही. अपंगांकडून चिरीमिरी जर मिळणार नसेल मग का म्हणून हे उपद्व्याप वाढवावे ? अपंग हा त्याच्या शारीरिक उणीवांमुळे, गरिबीच्या परिस्थितीमुळे आंदोलन करू शकत नाहीत. मग अधिकाऱ्यांनी याकडे का म्हणून लक्ष द्यावे ? म्हणतात ना की, ‘रडल्या शिवाय आई सुद्धा बाळाला दुध पाजत नाही’. पण माणुसकी या नात्याने (अर्थात जर थोडीफार शिल्लक असेल तर) हे पाउल शक्य असतांना प्रशासन याकडे का लक्ष देत नाही ? याला जेवढे प्रशासन जबाबदार आहे तेवढेच शासन सुद्धा जबाबदार आहे. कारण सवलती तर जाहीर केल्या पण त्याची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही हे बघण्यासाठी स्वार्थाची पट्टी आपल्या चक्षुंवर असलेल्या व संवेदन हीन विचारशक्ती असलेल्या राजकारण्यांना हे बघायला वेळ नाही. मौलाना आझाद अल्पसंख्यांक महामंडळ असतांना बऱ्याच ठिकाणी त्यांचे कार्यालय नाही, असले तर तेथे कोणीतरी सुशिक्षित बेरोजगार बसतो, ज्याला शासनाच्या स्कीम बद्दल काहीही माहिती नसते. साहेब तर कार्यालयात येतच नाहीत आणि शेवटी आलेले अनुदान परत जाते. मात्र आम्ही इतके कोटी अनुदान दिले होते, लाभार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला नाही असे सांगून आपली जबाबदारी झटकून मोकळे होतात. अनुदान परत का जाते ? यंत्रणा काम करत आहे किंवा नाही याच्याशी शासनाला काही देणेघेणे नाही. राज्य कोणत्याही पक्षाचे असो, प्रशासनाची कार्यप्रणाली सुधारण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. याकडे शासनाने गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे. माणुसकी, पुण्य, देशाच्या खाल्लेल्या मिठाला जागणे या गोष्टींचा थोडाफार विचार केल्यास शासनाच्या सवलती योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवील्यास नक्कीच आशीर्वाद मिळतील. पण प्रशासनाची ती दानत नाही आणि शासनाला त्याच्याशी काही देणेघेणे नाही. हे किती दिवस चालेल ? नंदुरबार जिल्हा हा सर्वात गरीब जिल्हा असल्याचा शासनाकडे अहवाल असतांना सुद्धा याकडे लक्ष का दिले जात नाही ? लोकसेवक असो, अधिकारी असो यांना आपल्या कर्तव्याची जाण राहिली नाही. किमान आता तरी अपंगांना बीपीएल कार्ड देण्याबाबत शासनाने व प्रशासनाने योग्य ते पाउल उचलावे ही अपेक्षा.(डॉ. एस. बी.शाह, संपादक NDT न्यूज, नंददूत, नंदप्रहर, शहादा, जि. नंदुरबार. मो. ९४०५५३९०९१).
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या