Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यामुळे बैलगाडी मालकांमध्ये उत्सव.

प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठ वली आहे. राज्यात बैलगाडी शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.
 या निर्णयामुळं राज्यातील बैलगाडी मालकांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षाचा युक्तिवाद काल पूर्ण झाला होता. आज सुनावणीच्या सुरुवातीला मुकुल रोहतगी यांचा राज्य शासनाकडून युक्तिवाद केला. 
बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. २०१७ साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडी शर्यतींवर बंदी घातली होती. याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सात वर्षांनंतर बैलगाडी शर्यतीला पुन्हा सुरू होणार असल्याने बैलगाडी मालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. 
या निर्णयाचे स्वागत चांदवड तालुक्यातील असंख्य बैलगाडी प्रेमी यांनी केले असून आनंदोत्सव साजरा केला. 
चांदवड येथील विलास सोनवणे  हिवरखेडे येथील हरिभाऊ शिंदे, बालाजी ठाकरे साळसाने, तानाजी मापारी, रावसाहेब पवार राहुड, बाळू पवार राहुड, सोनू शिंदे डोंगरगाव, रायपूर भडाने येथील नारायणराव, पिलू सोनवणे मंगरूळ; संतोष सावन  गणुर पाटील बंडू पाटील या चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांनी व बैलगाडा मालकांनी आनंदोत्सव साजरा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या