Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाडमध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन....



 प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

मनमाड : श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड मध्ये दरवर्षी गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या प्रकाश पूरब निमित्ताने सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात येत असते. 


  यंदाच्या वर्षीच्या श्री गुरू गोविंदसिंगजी महाराज यांच्या 355 व्या पावन प्रकाश पूरब निमित्ताने दि.17,18 ,19 डिसेंबर रोजी गुरुद्वारामध्ये सालाना जोडमेलाचे आयोजन करण्यात आले आहे.याप्रसंगी अखंड पाठ , भजन,कीर्तन,लंगर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन श्री मेहेल सिंगजी आणि श्री बलदेव सिंगजी (वडाळा) हे तीन दिवस कथा आणि किर्तन गुरुद्वारामध्ये सादर करणार आहे. सालाना जोडमेला निमित्ताने गुरुद्वाराला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली असुन या उत्सवामध्ये अनेक राज्यातील शीख बांधव , मान्यवर आणि कलाकार सहभागी होणार आहे.


   दिनांक 19 डिसेंबर (रविवार) दुपारी 3.00 वाजता गुरुद्वारा पासुन संपुर्ण मनमाड शहरामध्ये भव्य स्वरूपात नगर किर्तनाचे आयोजन करण्यात आले असुन , सालाना जोडमेला उत्सवात शहरातील सर्व धर्मिय नागरिक आणि भाविकांनी सहभागी व्हावे असे आव्हान गुरुद्वारा प्रबंधक श्री बाबा रणजितसिंह जी यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या