मनुष्याच्या जन्माबरोबर त्याचे कर्म आणि कर्तव्य सोबत येत असते-, कामगार श्रेत्र पत्रकार राजेंद्र- धिंगान मनमाड
ईश्वराने एवढी सृष्टी निर्माण केली, पण मनुष्यदेह निर्माण केल्यावर त्याला फार आनंद झाला. त्याला वाटले, खरोखर या योनीमध्ये जन्म घेणाऱ्याला माझे प्रेम मिळविता येऊन मला ओळखता येईल.परमेश्वरी कृपेची इच्छा हा भाव जरी आपल्या पूर्वजन्मीचे कर्म व संचित ठरवीत असले, तरी त्याच्याप्रती श्रद्धा व निष्ठा ठेवून कर्म करीत रहाणे व प्रत्यक्ष त्याचे आपल्या दैनंदिन जीवनात अनुभव घेणे ह्या दोन्ही गोष्टींमुळे आपण निश्चितच त्याचे अलौकिक रूप बघू शकतो. मनुष्य भूतलावर जन्माला आला की त्याच्याबरोबर त्याचे कर्म व कर्तव्य हे सोबत येतच असतात असे विचार प्रसिद्धीप्रमुख राजेंद्र धिंगान मनमाड यांनी व्यक्त केले आहे. ज्याला मनुष्य ' कर्मभोग ' असे म्हणतो ते म्हणजे खरं पाहता त्याचेच कर्तव्यात येणारे सुख-दु:ख हे आहे. जो पावेतो ह्या कर्मभोगांचा जीवनात समतोल असतो मनुष्य हा सुखात असतो, परंतु परमेश्वराने प्रत्येकाच्या जीवनात काही उणे ठेवले आहे आणि मनुष्य ते उणे भरून काढण्यासाठीच वणवण भटकत असतो. खरे पाहता, परमेश्वर हा निराकार आहे ,पण तो साकार मध्ये येऊन कार्य करतो , कारण परमेश्वर हा सर्वशक्तीवान आहे ती एक शक्ती आहे, ज्यामुळे ह्या सर्व जगाचं कार्य चालू आहे. ह्या जगतातली सर्व कार्ये ही परमेश्वराच्या आज्ञेत आहेत. मग आपण म्हणू की असे असतांना त्याने प्रत्येकात कोणत्या ना कोणत्या गोष्टीची उणीव का ठेवली? त्याचा हेतू असा असतो की मनुष्याने आपल्या जीवनात परमेश्वराला विसरु नये. कुणी म्हणेल की अस करण्यामागे परमेश्वराचे स्वार्थच नाही का? ह्यात त्याचे काय स्वार्थ, तुम्ही त्याचे स्मरण करा अथवा नका करू , परमेश्वराला काहीच फरक पडणार नाही. पण त्यानेच ह्या सर्व योजना आखल्या असतात आणि त्याची इच्छा मनुष्याला संसारातून तारण्याचीच व अंती स्वतः कडे ओढून मोक्ष प्राप्ती करून देण्याची असते म्हणूनच तो प्रत्येकाच्या जीवनात काही तरी अपुरे ठेवतो. जो परमेश्वर आहे असे मानतो आणि निष्काम कर्म करीत राहतो तो अंती ह्या संसारातून मुक्त होतो.
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
1 टिप्पण्या
या जगात मनुष्याला जन्माला येताना परमेश्वराने जे काही ठरवून दिलेले आहे ते कोणाला चुकणार नाही दंडवत प्रणाम
उत्तर द्याहटवा