खासदार श्री संजयजी राऊत यांच्या हस्ते मनमाड उपजिल्हा रुग्णाल येथील ऑक्सिजन गॅस प्लांटचे उद्घाटन सोहळा संपन्न....
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
मनमाड : शिवसेना नेते खासदार श्री संजयजी राऊत यांच्या हस्ते मनमाडला विविध विकासकामांचा उदघाटन सोहळा संपन्न झाला.
मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन गॅस प्लांटचे उद्घाटन करण्यात आले.शहरातील मुस्लिम बांधवांतर्फे मा,खासदार संजयजी राऊत यांचे मनमाड नगरीत भव्य स्वागत सत्कार करण्यात आले, तसेच नामदार संजयजी राऊत यांच्या हस्ते
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. इंडियन हायस्कूल येथे रोडच्या कामाचे भूमिपूजन करून , छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुतळा सुशोभिकरण कामाचे नारळ मान्यवरांच्या उपस्थितीत फोडण्यात आले. मनमाड येथील प्रसिद्ध असणाऱ्या गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेऊन गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजितसिंगजी यांच्या हस्ते खासदार श्री संजयजी राऊत यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नांदगाव तालुका आमदार श्री सुहास अण्णा कांदे व शिवसेना सर्व पदाधिकारी उपस्तीत होते,

0 टिप्पण्या