शैक्षणिक दीपस्तंभ राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने श्री. दिपक प्रभाकर व्यवहारे सन्मानित.
प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
मनमाड येथील कवि रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक श्री. दिपक प्रभाकर व्यवहारे सर यांना शैक्षणिक दिपस्तंभच्यावतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल 'शैक्षणिक दिपस्तंभ राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार' कोपरगांव येथे आयोजित कार्यक्रमात डाएट नाशिक चे ज्येष्ठ अधिव्याख्याता मा. श्री. डी. डी. सुर्यवंशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
शिक्षकदिनाचे औचित्य साधून शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शैक्षणिक दीपस्तंभच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. बाळासाहेब औटी (संघटन मंत्री, मध्य महाराष्ट्र प्रांत आखिल भारतीय ग्राहक पंचायत ) तसेच राहूरीचे गटशिक्षणाधिकारी मा. सुनिल सुर्यवंशी, कोपरगांवचे गटशिक्षणाधिकारी मा. पोपटराव काळे यांच्यासह दीपस्तंभचे संपादक मा. सुदामजी साळुंके व सर्व सहसंपादक आदि मान्यवर उपस्थित होते.
शैक्षणिक दिपस्तंभ तर्फे महाराष्ट्रातील शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट काम करणा-या प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, प्राध्यापक व साधनव्यक्ती यांचे राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार व राज्यस्तरीय गुणवंत पुरस्काराचे वितरण दिनांक ०३ आक्टोबर २०२१ रोजी कोपरगांव येथे करण्यात आले.
उच्च शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, राबविलेले विविध उपक्रम, तंत्रज्ञानाचा वापर, कृतीसंशोधन नाविन्यपूर्ण अध्यापनपध्दती आणि उपक्रम, तसेच कोरोनाकाळात शाळा बंद असतांनाही शिक्षण चालू ठेवण्यासाठी केलेले कल्पक प्रयोग आदी कार्याची दखल घेवून हा सन्मान मिळाला असून सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, मानाचे वस्त्र, बॅच, मेडल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्री. दिपक व्यवहारे यांना पुरस्कार जाहिर झाल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. या सन्मानाबद्दल शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर, संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. वैभव कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त श्री. धनंजय निंभोरकर, श्री. गणेश लहाने, श्री मनोज छावडा, श्री ज्ञानेश्वर माळी, श्री. तुषार चौधरी, डॉ. प्रदीप साळी तसेच शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, शुभचिंतक, मनमाड शहर तेली पंच मंडळ, युवा आघाडी पदाधिकारी तसेच विदयार्थी-पालकवर्ग व सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

0 टिप्पण्या