Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 प्रहार अपंग क्रांती टाला ठोको आंदोलन मागे



प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

प्रहार अपंग क्रांती आंदोलन मनमाड शहर शाखेच्या वतीने.... दिवाळीच्या आत


५%निधी दिव्यागांच्या थेट बँक खात्यात जमा करावा अन्यथा २७ आॅक्टोंबरला *टाकला ठोको* आंदोलन करण्यात येईल  असा इशारा देण्यात आला होता....

या आंदोलनाची दखल मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी  मा. प्रितमकुमार मुंडे साहेब यांनी घेत  दिवाळीच्या आत दिव्यांगाच्या खात्यात रक्कम जमा होईल असे पत्रक काढून  उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे व नगरपालिकेचे अधिकारी संदिप आगोणे यांच्या हस्ते पत्रक देण्यात आले.

यावेळी प्रहारचे जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर,शहर अध्यक्ष जाफर शहा, महिला संघटक संगिता सांगळे, तालुका सचिव सुरेश गांगुर्डे आदी उपस्थित होते.

तसेच मनमाड शहर हद्दीतील ज्या दिव्यांग बांधवांचे नाव नगर पालीकेच्या यादीत नसेल आशा नवीन दिव्यांग बांधवांनी उद्या दिनांक २६/१९/२०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत शिवांजली झेरॉक्स पाकिजा काॅर्णर सानप काॅम्प्लेक्स समोर (सुरेश गांगुर्डे) व बु-हाण झेरॉक्स  कोर्ट रोड येथे  कागदपत्रे जमा करावे.

असे आवाहन जिल्हा संपर्कप्रमुख 

हिरामण मनोहर व मनमाड नगर पालिकेने केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. मनमाड नगर पालिकेचे मुख्याधिकारी मा. प्रितमकुमार यांचे प्रहार अपंग क्रांती आंदोलन मनमाड शहर शाखे तर्फे खुप खुप आभार

    उत्तर द्याहटवा