Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 के.आर.टी .शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश करताच शाळेकडून पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले,




प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.

शासन आदेशाप्रमाणे दिनांक ४ ऑक्टोबर २०२१पासून शहरी भागात इयत्ता आठवी चे बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले आहे. येथील कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी यास अतिशय चांगला प्रतिसाद दिला.



प्रत्यक्ष शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांचा प्रवेश झाल्यानंतर शाळेकडून त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी सामाजिक अंतर पालनाचे चिन्ह टाकण्यात आले होते. त्यावर विद्यार्थी उभे राहिले. प्रत्येक विद्यार्थ्याने सेनिटायझरचा वापर केला. प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क घातलेला आहे याची सुरुवातीलाच खात्री केली जाते. त्यानंतर विद्यार्थ्यांचे तापमान घेण्यात येते व त्याची वर्गनिहाय नोंद करण्यात आली. उपस्थित विद्यार्थ्यांचे संगीतमय वाद्यपथकाने स्वागत केले. तसेच शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले व उपस्थित विद्यार्थ्यांना पेन चॉकलेट चे वाटप करून त्यांच्या बैठक व्यवस्थेत पर्यंत घेऊन जाताना त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या स्वागताने सर्व विद्यार्थी व शिक्षक यांची मन अगदी भरून आले होते. विद्यार्थीदेखील आपल्या स्वागताने भारावून गेले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्यास मागील पंधरा महिन्यातील आपले अनुभव, आपले विचार, कोरोनाकाळात त्यांच्या मनातील घालमेल, भाव भावना, कुटुंबासोबत घालवलेले दिवस व online पद्धतीने घेतलेल्या शिक्षणाचे अनुभव इत्यादी बाबत आपले विचार व्यक्त करण्यासाठी संधी देण्यात आली. 'माझी शाळा-माझी जबाबदारी या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. तसेच शाळेकडून तयार केलेले विविध स्लोगन जसे 'मास्क नाही तर प्रवेश नाही', 'कोरोनाची थांबवा साथ- वारंवार धुवा आपले हात', 'ठेवू सुरक्षित अंतर-कोरोना होऊ दे छु मंतर', 'कोरोनाशी कट्टी- नको खेळ, नको मधली सुट्टी', 'आम्ही केआरटी चे विद्यार्थी जबाबदार-मास्क लावून शाळेत येवू रुबाबदार', 'शिकायची आहे शाळा-कोरोनाचे नियम पाळा' देण्यात आले.



प्रत्यक्ष शाळा सुरू राहण्याकरिता प्रत्येक विद्यार्थी व शिक्षकाने आपली जबाबदारी काटेकोरपणे पाळावी. जेणेकरून भविष्यात पुन्हा शाळा बंद ची टांगती तलवार आपल्यावर राहणार नाही. असे मार्गदर्शन शाळेचे प्राचार्य श्री. मुकेश मिसर सर यांनी केले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह श्री. वैभव कुलकर्णी, श्री. दिपक व्यवहारे आणि श्री. धनंजय निंभोरकर यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या