गेल्या ५० वर्षाच्या आश्वासनानंतर रस्त्याच्याचे भुमिपुजन होऊन तातडीने नुतन कॉंक्रीटीकरण रस्ता
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
.मनमाड .प्रभाग क्रमांक 10 मध्ये दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी शिवसेना नगरसेविका सौ.सुरेखा सुधाकर मोरे यांचे प्रयत्नातून जमदाडे चौक,तांबोळी चाळ व इतर ठिकाणी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याचे कामकाजास प्रभागातील महिला व नागरिकांच्या हस्ते नारळ फोडुन सुरवात करण्यात आली.सदर रस्ता सुमारे 50 वर्षानंतर झाल्याचे प्रभागातील जेष्ठ नागरिकांनी सांगितले. यावेळी अॅड सुधाकर मोरे , रविद्र खैरणार , अमोल केदारे , नगरसेविका सौ सुरेखा मोरे , व मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.

0 टिप्पण्या