Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 अनधिकृत अतिक्रमण निष्कसित कारवाई साठी नगरपरिषद खाली धरणे आंदोलन,




प्रतिनिधी.आफरोज अत्तार.8888509003


मनमाड: केकाण नगर भागातील सर्व्हे नंबर 277 व 278 वरील सुमारे 75×50 पत्र्याचे शेड टाकून अनधिकृत अतिक्रमण करण्यात आलेले असून,सदर अतिक्रमण तात्काळ निष्कसित करण्याची मांगणी संत रविदास सहकारी गृहनिर्माण संस्था अतिक्रमण कृती समिती तर्फे नगरपरिषदला करण्यात आली होती, परंतु नपा तर्फे सदर अतिक्रमण धारक यांना नोटीस देऊन काही एक कारवाई झालेली नाही, आज रोजी सदर नोटिसाची मुदत देखील संपली आहे,तरी मुख्यधिकारी साहेब यांनी तात्काळ दखल घेऊन अतिक्रमण कारवाई करावी या करिता आज संत रविदास सहकारी गृहनिर्माण संस्था अतिक्रमण कृती समिती तर्फे नगरपालिका खाली एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले,


या आंदोलनाची दखल घेत मुख्यधिकारी साहेब यांनी आंदोलनस्थळी भेट देत 30 दिवसात अतिक्रमनावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले, आश्वासन नंतर आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले  या वेळी रंगनाथ दरगुडे,लीला मिसर,मोहन भागूजी पिरनाईक,एस एम भाले,शोभा साळवे,जे पी कुलकर्णी,ज्ञानेश्वर वेलेवर,बाळू सुपेकर,चंद्रकांत जाधव,चिराग शेख,अशोक बागुल,आत्माराम,


संस्थेचे इतर पदधिकारी कार्यकर्ते उपस्तीत होते,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या