मनमाड शहरात मोकाट जनावरांचा रस्ता रोको आंदोलन,नगर पालिके ने तात्काळ दखल घ्यावी,
शासनाने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिक आता नोकरी, व्यवसायासाठी घराबाहेर पडत आहेत. अशा वेळी मनमाड शहराच्या रस्त्यावर उभे असलेल्या मोकाट जनावरांमुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
मनमाड शहराच्या रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचाही ठिय्या रोज दिसून येतो. मोकाट जनावरे ही नागरिक आणि वाहनांना घाबरत नाहीत. हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता ते अंगावर येत असल्यामुळे नागरिकांचा अशा मोकाट प्राण्यांना घाबरून अपघात होत आहे, त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
सकाळी फिरण्यासाठी निघाल्यावर वाहन चालकांबरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनां अपघाताचा धोका आहे.रस्त्यात मोकाट जनावरे व अन्य प्राण्यांचा नाहक त्रास होतो. त्यामुळे अपघातांची शक्यता नाकारता येत नाही.नगरपरिषद तर्फे मोकाट जनावरांच्या मालकांविरोधात कडक कारवाई करून,तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त केले पाहिजे,अशी मांगणी नागरिकांतर्फे केली जात आहे,

0 टिप्पण्या