आमदार सुहास आण्णा कांदे यांचा आत्मदहनाचा इशारा.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेनेचे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यामधील वाद अधिकच वाढत आहे. आमदार सुहास कांदे यांनी जिल्हा नियोजन समितीचा निधी वर्ग करु नये असे सांगत जिल्हाधिकारी यांना पत्र दिले. त्यात पोलिसात तक्रार करुन आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला आहे. काल कांदे यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे भुजबळांविरोधात तक्रार केली आहे. त्यामुळे पुढील काळात हा संघर्ष अजून पेटणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे जेष्ठ नेते खा. संजय राऊत यांच्या नांदगाव भेटी नंतर या वादावर पडदा पडेल असे वाटत असताना आता सुहास कांदे यांनी परत जिल्हाधिकारी यांना पत्र देत भुजबळाविरोधात पुन्हा दंड थोपटले आहे.

0 टिप्पण्या