मनमाड .शहर युवासेनेच्या वतीने रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध करण्यात आला.
प्रतिनिधी . आफरोज रफीक अत्तार.
मनमाड: सत्तेत येण्यापूर्वी मोदी सरकारने तमाम भारत वासियांना "अच्चे दिन" दाखविण्याचे वचन दिले होते. पण, निवडणुकीनंतर "चुनावी जुमला" म्हणत तमाम भारत वासियांना महागाईच्या खाईत ढकलले.देशात इंधन दरवाढीने जनता होरपळून जात असताना, पंतप्रधान मोदींचे परदेश दौरे चालू आहेत. हेच का मोदी सरकारचे अच्छे दिन? असा सवाल करीत रविवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मनमाड शहर युवासेनेच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढीचा जाहीर निषेध केला.
मा.आमदार. सुहास अण्णा कांदे व युवा सेना युवा जिल्हाध्यक्ष फरान दादा खान,
यांच्या नेतृत्वात शिवसेना मनमाड शहर कार्यालय, येथून या रॅलीची सुरवात करण्यात आली. यावेळी "जय भवानी, जय शिवाजी", "युवासेना जिंदाबाद", "पर्यावरण मंत्री.मा.श्री.आदित्यजी ठाकरे साहेबांचा विजय असो" "पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या भरमसाठ दरवाढ करणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो", "मोदी सरकार हाय हाय" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी बोलताना युवती शहर अध्यक्ष स्नेहल जगताप यांनी, ' देशात पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा उच्चांक झाला आहे. इंधन दरवाढीमुळे मध्यमवर्ग, चाकरमानी, शेतकरी, बेरोजगार युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. देशातील नागरिक एकीकडे कोरोना महामारीच्या संकटातून सावरत असतानाच दुसरीकडे केंद्र सरकार वारंवार इंधनात दरवाढ करून सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत करत आहे. भारतात पेट्रोल व डिझेलच्या किमती झपाट्याने वाढत आहेत. शंभर रुपयांच्यावर पेट्रोल, डिझेलचे दर गेले असताना त्यात दर दिवशी आणखी वाढ करत आहे. पेट्रोल व डिझेल दरवाढीमुळे महागाई वाढत आहे.'
शिवसेना मनमाड शहर कार्यालय, येथून सुरु करण्यात आलेली निषेध रॅली एसटी स्टँड रोड, पाकीजा कॉर्नर, नगिना मस्जिद रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक , एकात्मता चौक,येथे येवून सांगता करण्यात आली. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अल्ताफ (बाबा) खान, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, जिल्हा उपप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा समन्वयक सुनील पाटील, तालुका उपप्रमुख दिनेश केकान, सुभाष माळवतकर, विधानसभा संघटक संतोष जगताप, युवासेना जिल्हाउपप्रमुख मुन्ना दरगुडे, युवासेना उपतालुकाप्रमुख आशिष घुगे, राहील मन्सुरी, नांदगांव तालुका समन्वयक योगेश इमले, तालुका सरचिटणीस सचिन दरगुडे, तालुका विधानसभा समन्वयक नितीन सानप, युवासेना शहरअधिकारी अमीन पटेल, अंकुश गवळी,
युवतीसेना तालुकाप्रमुख नेहाताई जगताप, उपतालुकाप्रमुख पूजाताई छाजेड, तालुका सरचिटणीस स्नेहल जाधव, सपना महाले, युवतीसेना शहर अधिकारी अंजली सूर्यवंशी, वाहतूक सेना शहराध्यक्ष अमजद शेख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समन्वयक पिंटू भाऊ वाघ,
युवासेना शहरचिटणीस स्वराज देशमुख, माजी युवासेना शहर अधिकारी अमोल दंडगव्हाळ, उपशहरअधिकारी अजिंक्य साळी, सिद्धार्थ छाजेड, आशिष पाराशर, शुभम खैरे, युनूस शेख.
शिवसेना मनमाड शहरउपप्रमुख - जाफर मिर्झा, मुकुंद झाल्टे, निलेश ताठे, लोकेश साबळे, मिलिंद पाथरकर, दिनेश घुगे, अतुल साबळे, पिंटू साळुंखे, आप्पा आंधळे, महेंद्र गरुड, परेश राऊत, विकी सुरवसे, स्वप्निल सांगळे, पंडित सानप, कृष्णा जगताप, अनिल दराडे.
शिवसेना नगरसेवक - लियाकत शेख, कैलास गवळी, प्रमोद पाचोरकर, विनय आहेर, सुनील हांडगे, विजय मिश्रा, गालिब शेख, हर्षल भाबड.
युवासैनिक युवतीसैनिक व शिवसैनिक - यश व्यवहारे मोनू पटेल, मिहिर मसीहा, प्रतिक कदम, दादा पगारे, सचिन जाधव, यश खरोटे, मोईन सैय्यद, ओम सानप, जाफर शहा, सनी बोरसे, राजेश गवळी, पवन गवळी, सागर, गवळी, विशाल भोसले, बाली पटेल, सनी आहेर, अनिकेत जाधव, गौरव पवार, नंदू पीठे, सोफिया सोनवणे, रेश्मा खान, शहनाज रब्बानी, समीरा शेख, पायल ओहोळ, मीनाच् पठाण, हिना शेख, प्रियंका आहिरे, समता आहिरे, सागर दरगुडे, शुभम काळे, राम शिंदे, सागर सानप, किरण चारोडे, मंगेश जाधव, बुद्धभूषण गरुड, बबलू संसारे, विनोद जाधव, विजय जगताप, प्रकाश राऊत.
मोठ्या संख्येने शिवसैनिक युवासैनिक युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या