मनमाड इंदोर महामार्गावर अपघाताची मालिका कधी थांबणार.?
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
मनमाड इंदोर महामार्ग, मनमाड-ते- मालेगाव रस्त्यात अनेक मोठे मोठे खड्डे पडलेले आहे,या खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, दि,24,ऑक्टोबर रोजी, जमील शेख रीयाज,वय 28 वर्ष,राहणार ,देवीचा मल्ला मालेगाव हा दुचाकीस्वार मनमाड हुन मालेगाव घरी जात असताना चोंडी जळगाव जवळील पुला जवळ त्याचा अपघात झाला,या अपघातात जमील शेख यांच्या डोक्यावरून मोठा ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला,
काही दिवसा पूर्वी असाच अपघात झाला होता त्यात मनमाड शहरातील दावत नगर मस्जिद चे (ईमाम) मौलाना अफजल यांना देखील आपले जीव गमवावे लागले होते,व मौलाना अफजल यांची पत्नी देखील त्या अपघातात गंभीर जखमी झाली होती, सध्या मौलाना अफजल यांच्या पत्नी चे मालेगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे,व त्यांचे जीव वाचण्यासाठी एक पाय काढावे लागेल अशी माहिती नागरिकां तर्फे ऐकाला मिळाली आहे,
दि,24/10/2021 काल झालेल्या जमील शेख रीयाज यांच अपघात हे खूपभयानक व अंगावर काटे आनणारा होता असे नागरिकां तर्फे सांगण्यात आले,,
अपघातात बळी गेलेल्या
जमील शेख रीयाज यांना दोन मुल व दोन मुली असून,त्यांचा सर्वात लहान मुलाच वय फक्त आठ महिने आहे,त्यांच्या पश्चात, पत्नी व चार मुलं असे कुटुंब असून,अत्ता त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहचा कसा होईल असा प्रश्न निर्माण झाला आहे,
शासनाने जमिल शेख रीयाज, कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत करावी,व यांच्या विधवा पत्नीस,
मालेगाव महानगरपालिकेत शासकीय नोकरी द्यावी,तसेच कोपरगाव- मनमाड-मालेगाव महामार्ग रस्ता तात्काळ दुरुस्त करावा, जेणे करून मौलाना अफजल व जमील शेख रीयाज सारखे कुटुंबकर्तांची बळी जाणार नाही,अशी मांगणी, वंचित बहुजन आघाडी जिल्हा सचिव कादिर शेख,यांनी जन आवाज शी बोलतांना केली आहे,

0 टिप्पण्या