रेल्वे दवाखाना संदर्भात समस्या वर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा च्या शिष्टमंडळाने झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या नेतृत्वाखालील भुसावळ मंडल चे अप्पर मंडळ प्रबंधक आयु.नवीन पाटील यांची भेट घेऊन मनमाड येथील रेल्वे दवाखाना संदर्भात समस्या वर चर्चा करून निवेदन देण्यात आले.
मनमाड रेल्वे दवाखाना हा फक्त एक शिफ्ट मध्ये दिवसा चालू आहे.रेल्वे दवाखाना दोन शिफ्ट मध्ये रात्री चालू पाहिजे.मनमाड मध्ये रेल्वे वर्कशॉप, ओपन लाईन व सेवानिवृत्त कर्मचारी आहे मोठ्या संख्येने रेल्वे कर्मचारी आहेत.
म्हणून रेल्वे दवाखाना म्हणून दोन शिफ्ट चालू करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळामध्ये ओपन लाईन शाखा चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, ओपन लाईन शाखा चे सचिव चेतन अहिरे,विक्की अहिरे, वसंत सोनवणे, कांबळे आदीचा समावेश होतो.

0 टिप्पण्या