रेल्वे खासगीकरणाविरोधात विरोध प्रदर्शन!
प्रतिनिधी.आफरोज रफीक अत्तार.
भारतीय रेल्वे वर फार मोठ्या प्रमाणावर खासगीकरण सुरू आहे,अनेक रेल्वे,स्टेशन,कारखाने खासगी उद्योगाला देण्याचा धडाका सरकारतर्फे सुरू आहे,या विरोधात झोनल कार्यकारिणी, मध्य रेल्वे, मुंबई यांच्या आदेशानुसार १ऑक्टोबर २०२१ रोजी केंद्रीय इंजिनिअर कारखाना मनमाड येथे ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे विरोध प्रदर्शन भोजन अवकाश दरम्यान दुपारी12:०० वा. करण्यात आले.. विरोध प्रदर्शन संपन्न झाल्यावर प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांना विभागा मार्फत निवेदन पाठविण्यात आले.
या निवेदनात रेल्वेतील खासगीकरण,निगमीकरण त्वरित थांबवावे,पदोन्नतीतील आरक्षण कायम करण्यात यावे, रेल्वे प्रशिक्षणार्थी(ट्रेड अप्रेंटिस) यांना रेल्वे नोकरीत समाविष्ट करण्यात यावे, नाशिक रोड येथील रेल्वे कारखाना मध्ये इतर मंडळातील ज्या कर्मचाऱ्यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे त्यांना त्वरित सोडण्यात यावे.या इतर मागण्या सामाविष्ट आहे.
. सदर कार्यक्रम झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली व झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे यांच्या नेतृत्वाखाली आयोजन करण्यात आले होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आयु.सिध्दार्थ जोगदंड (कार्याध्यक्ष कारखाना शाखा) यांनी केले.तर आभार प्रदर्शन कल्याण धिवर यांनी केले. यावेळी सचिन इंगळे,शरद झोबाड, पंढरीनाथ पठारे, किरण कातकडे( कोषाध्यक्ष NRMU कारखाना शाखा), महेंद्र चौथमल(CRMS कारखाना शाखा), रतन निकम(ऑल इंडिया ओबिसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा) संतोष सोनवणे (महाराष्ट्र नवनिर्माण रेल कामगार सेना)आदी ची भाषणे झाली. यावेळी असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सहाय्यक कारखाना प्रबंधक पापाचंद व सहाय्यक कर्मिक अधिकारी सत्यजित गवंदे,ए.व्ही.कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
रमेश पगारे (आति.सचिव कारखाना शाखा), हा संदीप पगारे (वरिष्ठ उपाध्यक्ष कारखाना शाखा) सागर गरुड (उपाध्यक्ष कारखाना शाखा) सुभाष जगताप (उपाध्यक्ष कारखाना शाखा) सुनील सोनवणे (कारखाना शाखा चेसहाय्यक सचिव) रत्नदिप पगारे (कोषाध्यक्ष, ओपन लाईन), संदिप धिवर (सचिव ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड), राकेश ताठे ( संचालक मंडळ सदस्य, कंन्झुमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी मनमाड),सचिन इंगळे(कारखाना शाखा, संघटक सचिव), नवनाथ जगताप(सचिव, बहुजन युवक संघ), साईनाथ लांडगे(कोषाध्यक्ष, बहुजन युवक संघ),हर्षल सूर्यवंशी,प्रेमदीप खडताळे, किरण आहिरे,विशाल त्रिभुवन,संदीप अर्जुन पगारे, गुलाब वैरागर, अल्ताफ खान, किशोर खंडागळे, किरण अहिरे , अर्जुन बागुल, विलास कराड,
सागर साळवे ,विशाल घोडके,दिपक राऊत, राहुल शिंदे, निखिल सोनवणे, फकीरा सोनवणे, प्रभाकर निकम, रवींद्र पगारे, संतोष गायकवाड, संतोष शिलावट, विनोद खरे, वरुन म्हस्दे,गुफराण खान,नदीम सैय्यद,सुरज खैरनार, अंजनाबाई सुपेकर, मंगलाताई पगारे,रेखा जाधव,सचिन गरुड, हिराबाई बोरसे आदींनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी कामगार व महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या हातात काळे झेंडे व निळे झेंडे होते.

0 टिप्पण्या