*राष्ट्रीय पोषण माह निमित्त अंगणवाडीताई करत आहे जनजागृती*
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी नाशिक -२ अंतर्गत अंगणवाडी क्र.७५ .मनमाड विभाग येथे पोषण माह निमित्त गरोदर महिलांचे अँनिमिया तपासणी ,उपचार आणि समुदेशन शिबिर आयोजित करण्यात आले. उपस्थित गरोदरला लोहयुक्त आहार घेण्यास सांगितले.पालेभाज्या,मुग,मसुर,राजमा ,छोले ,उडीद तसेच मासांहार,व्हिटामिन 'सी ' युक्त पदार्थ या सर्व अन्न घटकांचा समावेश करायचा आहे . सोबत दुग्धजन्य पदार्थाचा समावेश करायचा आहे .
महिलांना तरंग सुपोषित महाराष्ट्राचा ,जंतनाशक गोळी वाटप ,आहार,स्वच्छता ,पोषणवाटिका या विषयी मार्गदर्शन करण्यात आले . प्रकल्प अधिकारी अजय फडोळ सर आणि मुख्यसेविका शितल गायकवाड मँडम यांचे मार्गदर्शना खाली काम केले जात आहे .

0 टिप्पण्या