Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर फेरीवाला सहाय्य या योजनेअंतर्गत मनमाड नगर परिषद व बँक ऑफ बडोदा शाखा मनमाड यांचे मार्फत कर्ज वितरित झालेल्या पथ विक्रेत्यांना मै भी डिजिटल आणि संकल्प सिद्धी या योजनेअंतर्गत ऑनलाइन व डिजिटल पेमेंट बद्दल मार्गदर्शन

प्रतिनिधी.आफरोज अत्तार.

माननीय डॉक्टर विजयकुमार मुंडे मुख्याधिकारी मनमाड नगर परिषद मनमाड यांच्या मार्गदर्शना नुसार दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहर फेरीवाला सहाय्य या योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा शाखा मनमाड यांचे मार्फत कर्ज वितरित झालेल्या पथ विक्रेत्यांना मै भी डिजिटल आणि संकल्प सिद्धी या योजनेअंतर्गत ऑनलाइन व डिजिटल पेमेंट बद्दल मार्गदर्शन करण्यात आले व बडोदा बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री धीरज कुमार उपाध्ये सर आणि श्री रणजित सोमवंशी सर यांनी लाभार्थ्यांना क्यूआर कोड चे वाटप करून माहिती दिली तसेच नगर पालिकेचे शहर व्यवस्थापक श्री संदीप आगोने यांनी योजनेबद्दल माहिती दिली तसेच शहर व्यवस्थापक श्री विलास कातकडे यांनी पीएम स्वनिधीच्या नवीन नियमावली बद्दल मार्गदर्शन केले सर्व कार्यक्रमाचे आयोजन नगरपालिकेचे समुदाय संघटक श्री वर्धन कुशारे यांनी केले या वेळी फेरीवाला समितीचे सदस्य श्री अकबर शाह , सीएससी केंद्र चालक अक्षय सानप तसेच सर्व लाभार्थी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या