नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळलेली असताना मनमाड येथे आंदोलकांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. नांदगाव तहसीलदार यांच्यामार्फत मंडल अधिकारी मनमाड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, उच्च शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या NEET परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेतली असताना पेपरफुटीमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरले आहे. काही विद्यार्थ्यांना वयोमर्यादेमुळे पुढील संधी गमवावी लागणार असून या मानसिक तणावातून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोपही करण्यात आला.
परीक्षेची गोपनीयता आणि सुरक्षितता राखण्यात केंद्र शासन व संबंधित यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पेपर तयार करणाऱ्या आणि व्यवस्थापनाशी संबंधित घटकांच्या संगनमतामुळेच ही गंभीर घटना घडल्याचे सांगत, कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून लाखो रुपयांचा काळाबाजार सुरू असल्याची टीकाही करण्यात आली.
“विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,” अशी ठाम मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी प्रवीण पगारे, दीपक गायकवाड, शालिग्राम निकम, राजू ठेंगे, गौरव अहिरे, कैलास गायकवाड, तेजस शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या