एच ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मनमाड : येथील एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजमध्ये भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मालेगाव येथील समाजसेवक फारूकभाई अजमेरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव हज्जन सायरा मो. सलीम गाजियानी होत्या. यावेळी संस्थेचे अध्यक्ष हाजी मो. सलीम अहमद गाजियानी, सदस्य अफजल मोहम्मद सिद्दीक, अब्दुल करीम गाजियानी, आयशा मो. सलीम गाजियानी, अझिमभाई गाजियानी, सादिकभाई पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर व शेख आरिफ कासम यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी परेड मार्च सादर केला. तसेच विद्यार्थिनींनी देशभक्तीपर भाषणे, समूहगीत, नृत्य, लेझीम व पिरॅमिड यांसारखे मनोहारी कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उपशिक्षक शानूल सुभाष जगताप यांनी संविधानाचे वाचन केले. इयत्ता १० वी, १२ वी तसेच इतर सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देण्यात आली. यावेळी संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांनी महिला शिक्षिकांसह उत्कृष्ट संगीत कवायत सादर करून विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष हज्जन सायरा मो. सलीम गाजियानी यांनी आपल्या भाषणात प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका आरती चंद्रशेखर दखने यांनी केले तसेच उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक भुषण दशरथ शेवाळे व संस्थेच्या सदस्या आयशा मो. सलीम गाजियानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या