Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगाव नगरपरिषद निवडणूक २०२५: शिवसेना-भाजपा युती जाहीर; भगवा फडकवण्याचा निर्धार!

 

नांदगाव नगरपरिषद निवडणूक २०२५: शिवसेना-भाजपा युती जाहीर; भगवा फडकवण्याचा निर्धार!

नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव शहर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ साठी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांची भक्कम युती जाहीर करण्यात आली. आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या निवासस्थानी सौ. अंजुम ताई कांदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी युतीची अधिकृत घोषणा केली.

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार सुहास कांदे यांनी शिवसेना-भाजपा युतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन नगरपरिषदेवर भगवा झेंडा फडकवण्याचा विश्वास व्यक्त केला. "युतीच्या बळावर नांदगावचा सर्वांगीण विकास साधू," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

तालुका अध्यक्ष संजय सानप यांनी युतीच्या घोषणेची औपचारिक पुष्टी देताना कार्यकर्त्यांना उत्साहाने कामाला लागण्याचे आवाहन केले. तर व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी आमदार कांदे यांच्या विकासकामांच्या झंझावाताचा दाखला देत युतीला पाठिंबा देण्याचे कारण स्पष्ट केले.

 "अण्णांच्या नेतृत्वात नांदगावला नवे उंची मिळाली आहे, युतीमुळे हा विकास खऱ्या अर्थाने गतीमान होईल," असे छाजेड म्हणाले.

या प्रसंगी शिवसेना आणि भाजपाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. युतीमुळे नांदगावच्या राजकीय वातावरणात उत्साहाची लाट उसळली असून, निवडणुकीत भगव्या आघाडीचा दबदबा राहील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या