Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगर परिषद कामगार सेनेचे धरणे आंदोलन : भोंदू पत्रकाराविरुद्ध शासन कारवाईची जोरदार मागणी



 मनमाड शहरातील एका तोतया (भोंदू) पत्रकाराच्या मनमानी कारभाराविरुद्ध मनमाड नगर परिषद कामगार सेनेतर्फे आज भव्य धरणे आंदोलन छेडण्यात आले.

कामगार सेनेतील कर्मचारी यावेळी प्रचंड संताप व्यक्त करताना म्हणाले की –

"आमच्या जेवणाच्या वेळीच कार्यालयात घुसून व्हिडीओ शूटिंग करणे, महिला कर्मचाऱ्यांचे मुद्दाम व्हिडीओ काढून बदनामीस प्रवृत्त करणे, धाक-दडपण निर्माण करून आर्थिक फायद्यासाठी दहशत माजवणे, हे काही तथाकथित पत्रकारांकडून सुरू आहे. हे वर्तन पूर्णतः अमान्य असून, यावर तात्काळ आळा घालावा."
                 व्हिडिओ संपूर्ण पहा

कर्मचारी यांनी पुढे सांगितले की –

"मुंबई उच्च न्यायालयाने सार्वजनिक ठिकाणी व्हिडीओ काढण्यास परवानगी दिली असली तरी, महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान राखणे हे आवश्यक आहे. त्यांच्या व्हिडीओज काढताना सुरक्षित अंतर राखले गेले पाहिजे. आजच्या AI च्या युगात या व्हिडीओंचा गैरवापर होऊन महिला कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल केले गेले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?"

यामुळे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामकाज प्रचंड विस्कळीत होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भोंदू पत्रकारांच्या त्रासामुळे नागरिकांच्या कामकाजावर परिणाम होत असून, यामुळे नागरिकांमध्येही संतापाची लाट पसरली आहे.

"भविष्यात कर्मचारीवर्गाला अशा तोतया पत्रकारांचा त्रास होऊ नये म्हणून शासनाने अशा भोंदू पत्रकारांवर कठोर कारवाई करावी," अशी ठाम मागणी या धरणे आंदोलनात करण्यात आली.या वेळी मनमाड नगर परिषद मुख्यधिकारी साहेब यांनी योग्य ती तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

या आंदोलनामुळे मनमाड शहरात भोंदू तोतया पत्रकार विषयी चर्चा रंगून एकच खळबळ उडाली आहे.प्रशासन आता कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या