मनमाड (नाशिक): मनमाड शहरातील आयूडीपी परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या गाळ्यातून एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या मृतदेहामुळे पसरलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पूर्णपणे जीर्ण झाल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली. मृतदेह हलवणे शक्य नसल्याने पोलिसांनी आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने जेसीबीच्या साहाय्याने परिसरात खड्डा खणून मृतदेह दफन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जवळच असलेल्या नागरी वस्तीतील रहिवाशांनी याला तीव्र विरोध केला. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत मृतदेह तिथेच दफन करण्यास आक्षेप घेतला.
याची माहिती मिळताच मनमाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनीही या दफन प्रक्रियेला विरोध दर्शवला. परिणामी, मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे वय अंदाजे 40 ते 45 वर्षे असावे. मात्र, ही व्यक्ती कोण होती, कुठून आली, आणि किती दिवसांपासून मृत अवस्थेत होती, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
स्थानिक नागरिकांमध्ये संताप, प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. अशा संवेदनशील प्रकरणात प्रशासनाने घाईघाईने मृतदेह दफन करण्याचा निर्णय का घेतला, यावर तर्कवितर्क लढवले जात आहे
पालिकेची भूमिका
मनमाड नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत दफन प्रक्रियेला विरोध केला. पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, नागरी वस्तीत अशा प्रकारे मृतदेह दफन करणे योग्य नाही आणि याबाबत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या