8.20 लाखांच्या मोटारसायकलींसह मालेगांव शहरातून चोरट्यांचा पर्दाफाश, पोलिसांच्या गुप्त माहितीवर सापळा यशस्वी
मालेगांव कॅम्प पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मालेगांव शहर आणि परिसरातून चोरीस गेलेल्या तब्बल 23 मोटारसायकली (अंदाजे 8,20,000 रुपये किमतीच्या) जप्त करून मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी दोन सराईत आरोपींना अटक करण्यात आली आहे. मा. पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबीर सिंग संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज गुंजाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
दिनांक 24 जुलै 2025 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांच्या पथकाने डि.के. चौक येथे सापळा रचून मुख्य आरोपी भाऊसाहेब उत्तम चव्हाण (वय 36, रा. सोयगांव, मालेगांव) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त केलेली स्प्लेन्डर प्लस मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. पुढील चौकशीत त्याने 22 मोटारसायकली चोरी करून त्यापैकी 12 मोटारसायकली विक्रीसाठी ठेवल्याची, तर 10 मोटारसायकली त्याचा साथीदार न्हानू भगवान जाधव (वय 24, रा. जैताने, ता. साक्री, जि. नंदुरबार) याला विकल्याची माहिती दिली.
पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण 23 मोटारसायकली जप्त केल्या.ही कारवाई पोलीस हवालदार सचिन गोसावी, हितेश भामरे, रुपचंद पारधी, दिपक हेंबाडे, राजेंद्रसिंग राजपूत, पोलीस शिपाई हर्षल पवार आणि लखन पवार यांनी यशस्वीपणे पार पाडली. सध्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू आहे.
नागरिकांना आवाहन:
ज्या नागरिकांच्या मोटारसायकली चोरी गेलेल्या असतील, त्यांनी मालेगांव कॅम्प पोलीस स्टेशनला भेट देऊन जप्त मोटारसायकलींची पडताळणी करावी आणि आवश्यक कागदपत्रांसह आपली मोटारसायकल ताब्यात घ्यावी. जप्त मोटारसायकलींची यादी पोलीस स्टेशनला उपलब्ध आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या