मनमाड :- नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे ईद-उल-अज्हा अर्थात बकरी ईद मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी झाली. गुजराती हॉस्पिटलच्या मागील नवीन ईदगाह मैदानावर सकाळी 8:30 वाजता सामूहिक नमाज पठणाचा कार्यक्रम पार पडला. जामा मस्जिदचे प्रमुख मौलाना असलम रिजवी यांच्या नेतृत्वाखाली हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी देशात शांती, एकता आणि बंधुभाव कायम राहावा, यासाठी विशेष दुआ मागण्यात आली.
नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट घेत बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या, तर कब्रस्तानात जाऊन आपल्या पूर्वजांसाठी प्रार्थना केली. आबालवृद्ध मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मात्र, या उत्साहपूर्ण वातावरणात तयारीत नगरपरिषद तर्फे काही त्रुटींमुळे नागरिकांमध्ये नाराजीही पसरली. ईदगाह मैदानावर लावण्यात आलेला मंडप अत्यंत छोटा असल्याने वयोवृद्ध आणि लहान मुलांना उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागला. दरवर्षी विविध सणांसाठी लाखो रुपये खर्च करणाऱ्या मनमाड नगरपरिषदेने यंदा एवढा अपुरा मंडप का लावला, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. "नगरपरिषदेकडे निधीची कमतरता आहे का?" अशी चर्चा नागरिकांमध्ये रंगली.
याशिवाय, ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरील खड्ड्यांनीही नागरिकांची डोकेदुखी वाढवली. नगरपरिषदेने रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपयांचे टेंडर काढले असले, तरी मुरूमाऐवजी चिखलमिश्रित मातीचा वापर झाल्याने रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली. परिणामी, अनेकांना चिखलातून चालताना घसरण्याचा सामना करावा लागला. "खड्डे बुजवण्यासाठी डांबराचा वापर का केला गेला नाही?" असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
मनमाड शहर पोलिस निरीक्षक विजय करे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. पोलिस निरीक्षक करे यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देत शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले. तरीही, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे आणि अपुऱ्या व्यवस्थेमुळे नागरिकांनी नगरपरिषदेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
नागरिकांनी मागणी केली आहे की, भविष्यात अशा सणांदरम्यान योग्य नियोजन आणि दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. विशेषतः रस्त्यांचे खड्डे कायमस्वरूपी डांबराने बुजवावेत, जेणेकरून कोणालाही त्रास सहन करावा लागू नये.
याबाबत मनमाड नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया मिळालेली नाही. नागरिकांनी या समस्यांचे तातडीने निराकरण करून पुढील सण सुरक्षित आणि आनंदात साजरे करण्याची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या