Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात 17 वर्षीय युवकाचा खून; पाच आरोपी तात्काळ अटक


 नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात 17 वर्षीय युवकाचा खून; पाच आरोपी तात्काळ अटक

नाशिक: नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात पूर्ववैमनस्यातून 17 वर्षीय रविंद्र उर्फ मुन्ना दिपक आहीरे या युवकाचा पाच जणांनी मारहाण करून गळा चिरून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नांदगाव पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाचही संशयित आरोपींना अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रविंद्र याचे वडील दिपक आहीरे (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आकाश शरद सोनवणे, ऋषीकेश शरद पवार, विनोद शरद पवार, विजय एकनाथ सोनवणे आणि रविंद्र अंकुश गायकवाड (सर्व रा. मोरवाडी, साकुरी झाप, ता. मालेगांव) यांनी पूर्वनियोजित कट रचून रविंद्रवर हल्ला केला. आरोपींनी रविंद्रचा शर्ट फाडून, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरून त्याला ठार केले. खून करून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.

वाखारी येथील पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी या घटनेची तात्काळ माहिती नांदगाव पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि नंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, नांदगाव पोलिसांनी तपासाला गती देत अवघ्या काही तासांत पाचही आरोपींना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक सुनील बढे यांच्याकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा विश्वास निर्माण झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या