मनमाड: शहरात सध्या नगर परिषदेकडून अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी नोटीस देण्यात आली आहे. मात्र, सध्या धार्मिक सण आणि उत्सवांचा काळ सुरू असल्याने या कारवाईला कायमस्वरूपी स्थगिती द्यावी, अशी मागणी फेरीवाला टपरीधारक संघटनांकडून करण्यात आली आहे.
आज नगर परिषद प्रशासनास दिलेल्या निवेदनात सना-सुदीच्या कालावधीत कोणतीही अतिक्रमण कारवाई करू नये, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. हातगाडी टपरीधारक छोटे मोठे व्यापारी व स्थानिक नागरिकांनी यावेळी सांगितले की,साणा सुधीचे दिवस सुरु असुन आगामी काळात 14 एप्रिल, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील आहे, अशा वेळी अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे हातगाडी टपरीधारक छोटे मोठे व्यापारी यांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच, धार्मिक विधी, परंपरा आणि नागरिकांच्या धार्मिक भावना लक्षात घेता, ही कारवाई करण्यात येऊ नये.
आमच्या निवेदन मागणीला कायदेशीर व सामाजिक आधार आहे...फेरीवाल्यांचे हक्क व पुनर्वसन यासाठी "स्ट्रीट व्हेंडर्स (प्रोटेक्शन ऑफ लाईव्हलीहुड अँड रेग्युलेशन ऑफ स्ट्रीट व्हेंडिंग) कायदा, 2014" महाराष्ट्रसह देशात लागू आहे. यानुसार राज्यात फेरीवाला यांना कायद्याचे कवच प्राप्त आहे त्या नुसार नगरपरिषद यांनी फेरीवाल्यांसाठी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. असे असतांना फेरीवाल्यांसाठी नगर परिषद तर्फे योग्य नियोजन न करता फक्त नोटीसे देण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम, 1965 च्या कलम 244 नुसार, कोणत्याही अतिक्रमण कारवाईपूर्वी नागरिकांना पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. तसेच, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 नुसार प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार असून, प्रशासनाने धार्मिक सणांच्या काळात नागरिकांच्या श्रद्धांचा आदर करणे अपेक्षित आहे. याबाबत स्थानिक फेरीवाला टपरीधारक संघटनांचे म्हणणे आहे की, "सणाच्या दिवसांत शहरातील आर्थिक व्यवहारांवर मोठा परिणाम होतो. अशा वेळी प्रशासनाने सहकार्य करून कुठलीही कारवाई करू नये नागरिकांना कुठलाही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासनाने लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करून निवेदनात उल्लेख केल्याप्रमाणे, सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरामध्ये अतिक्रमण कारवाई करण्यात येऊ नये, असे फेरीवाला टपरीधारक संघटने तर्फे निवेदनद्वारे मागणी करण्यात आली आहे या वेळी. मनमाड नगर परिषद फेरीवाला समिती सदस्य कादिर शेख. भिमराज लोखंडे.सुरेश गांगुर्डे.सलमान अत्तार, सद्दाम अत्तार, शकील शेख. आकाश सोपे. जहीर शेख. किरण सोपे. हुसेन फिटर. अमजद पठाण. सईद शेख.फारुख शेख. फरहान खान अप्पू अत्तार, आदी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या