Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

एकाच कार्यालयातुन एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले जारी – संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

 

एकाच कार्यालयातुन एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले जारी – संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी


नांदगाव, दि. 19 मार्च : एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वर्षात मृत्यू दाखवून मृत्यु दाखले जारी करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणाची उकळ झाले आहे. यासंदर्भात राष्ट्रीय लोक आंदोलन, नांदगाव तालुका मनमाड शहर संघटनेने संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, एका व्यक्तीचे सन 1980 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर सन 2001 मध्ये त्यांच्या मृत्यूची अधिकृत नोंद केली होती. मात्र, यानंतरही सन 1990 मध्ये दुसऱ्या ठिकाणी मृत्यू झाल्याचे दाखवून सन 2012 मध्ये मृत्युची नोंद केली आहे.त्यामुळे एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे मृत्यू दाखले जारी होऊन मोठ्या प्रमाणावर घोळ निर्माण झाला आहे.

राष्ट्रीय लोक आंदोलन, नांदगाव तालुका संघटनेने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे नागरीकांना होणाऱ्या त्रासाबाबत प्रशासनाने जबाबदारी स्वीकारावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

सदर प्रकरणाबाबत राष्ट्रीय लोक आंदोलनाने जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आणि महसूल विभागाकडे लेखी तक्रार दाखल करणार असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या