Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

श्रीराम जन्मोत्सव समिती 2025 बैठक संपन्न

 

श्रीराम जन्मोत्सव समिती 2025 बैठक संपन्न.

श्रीराम जन्मोत्सव समिती 2025 बैठक संपन्न : श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे यंदाही सलग 39 व्या वर्षी भव्य स्वरूपात आयोजन होणार सालाबादप्रमाणे 1986 पासून यंदा ही अखंडीत पणे सलग 39 व्या वर्षी श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे रविवार दिनांक 06 एप्रिल 2025 रोजी चैत्र शुद्ध नवमी श्रीरामनवमी निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव तथा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणूक कार्यक्रमाचे नियोजन करणे साठी मनमाड शहरात धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जोपासणाऱ्या आणि धार्मिक उत्सव कार्यात मानाचे स्थान असणाऱ्या ॐ मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती 2025ची बैठक संपन्न झाली सर्व प्रथम श्रीराम जन्मोत्सव समिती चे माजी अध्यक्ष स्वर्गीय संतोषभाऊ बळीद आणि गत वर्षा मध्ये ज्ञात अज्ञात दिवंगत व्यक्ती ना समिती तर्फे सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली समिती चे संस्थापक सदस्य कोषाध्यक्ष नितीन पांडे यांनी बैठकी चे प्रास्ताविक करीत मागील 2024 या वर्षी च्या श्रीराम नवमी उत्सवाचा जमा खर्च सादर केला त्यानंतर एकमताने उपस्थितांन मधून या वर्षा साठी खालील प्रमाणे समिती सदस्य निवडण्यात आले श्रीराम जन्मोत्सव समिती 2025 योगेश बबलू  पाटील समीर गुंजाळ, कैलास दरगुडे, अनंता भामरे,सचिन छाजेड,मुकुंद एळींजे, आकाश त्रिभुवन, ऋषींकांत आव्हाड,गणेश कासार, कृष्णा जगताप, सागर दौलानी,राहुल गोसावी गौरव संसारे 

  यां बैठकीला सर्वश्री नाना शिंदे, नितीन पांडे किशोर गुजराथी , सुभाष माळवतकर यांनी मार्गदर्शन केले तर यंदा अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी वर भव्य श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा झाल्याचे दुसरे वर्ष आहे म्हणून मनमाड शहरातून यंदा भव्य श्रीराम रथयात्रा मिरवणुकीचे भव्य व आकर्षित करणारे असावे असे नियोजन करण्यात आले या बैठकीला गोविंद रसाळ शिवसेना शहर प्रमुख मयूर बोरसे रमाकांत मंत्री,नीलकंठ त्रिभुवन, दिनेश केकाण, आझाद आव्हाड, ,भाजपा शहर अध्यक्ष संदीप नरवडे, आनंद काकडे,लोकेश साबळे सुमेर मिसर,सनी दुसाने, ,परेश राऊत शेखर कातकडे,दीपेश इमले,यश खरोटे,बंटी गुप्ता पृथ्वीराज शिंदे प्रथमेश अहिरे,अभिषेक कांगणे निलेश व्यवहारे,सर्वेश जोशी,गौरव थोरात, लोकेश गवळी,चैतन्य शर्मा, पियुष माळवतकर,सतीश कौराणी,साहिल आव्हाड, गणेश भाबड राम घुगे, मयूर सानप,आदी सह मनमाड शहर व परिसरातील हिंदुत्ववादी पक्ष, संघटना संस्था मंडळे यांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते हितचिंतक व श्रीराम भक्त मोठया संख्येने उपस्थित होते बैठकी चे सूत्रसंचालन नितीन पांडे यांनी केले पसायदान ने बैठकी ची सांगता झाली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या