मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे "क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा" कार्यक्रमातील गुंतवणुकदारास प्रोत्साहन या सदराखाली नाशिक ग्रामीण पोलीस दलाची अंमलबजावणी
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे "क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा" कार्यक्रमातील गुंतवणुकदारास प्रोत्साहन या सदराखाली नाशिक ग्रामीण पोलीस दलाची अंमलबजावणी
मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी राज्यामध्ये शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी "क्षेत्रीय कार्यालयासाठी १०० दिवसांचा कृती आराखडा" निश्चित केलेला असुन त्या धर्तीवर क्षेत्रीय शासकिय व निमशासकिय कार्यालयाकरीता आगामी १०० दिवसांमध्ये ०७ कलमी कृती आराखडा तयार करून त्या मुद्दयांवर प्रभावी कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यास अनुसरून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस दलातर्फे आज दि. १६/०१/२०२५ रोजी गुंतवणुकीस प्रोत्साहन या सदराखाली नाशिक जिल्हयातील उद्योजक / कारखानदार यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, आडगाव येथे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नाशिक विभागाकडील पदाधिकारी तसेच इगतपुरी, घोटी, वाडीव-हे, त्रंबकेश्वर, पेठ, एम.आय.डी.सी. सिन्नर, निफाड, दिंडोरी, मालेगाव, येवला, चांदवड, मनमाड, नांदगाव या परिसरातील नामांकित कंपन्यांचे उद्योजक / कारखानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर बैठकीत उद्योजक / गुंतवणुकदार यांना त्यांचे गुंतवणुकीत सुरक्षा मिळावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरीता सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देवुन एम.आय.डी.सी. परिसरात सुरक्षेची उपाययोजना म्हणुन सी.सी.टी.व्ही., पोलीस चौकी, पेट्रोलिंग याबाबत विशेष लक्ष देण्यात येणार असुन सदर ठिकाणी असलेले सुरक्षारक्षक यांना सतर्कतेबाबतच्या सुचना देणेकामी त्यांना विशेष प्रशिक्षण तसेच त्यांचेशी समन्वय साधुन कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबत विचारविनिमय झाला. तसेच कोणतीही आपत्कालीन घटना / संकटसमयी / अपराध यावेळी पोलीस तात्काळ सदर ठिकाणी पोहचतील याबाबतचे नियोजनाकरीता सुरक्षारक्षक व पोलीस यांचेमध्ये कसा समन्वय साधता येईल याबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच उद्योजक / कारखानदार यांच्या तक्रारी, अडचणी समजुन घेवुन त्यांचे निरसन कसे करता येईल यासंबंधाने चर्चा झाली. मा. मुख्यमंत्री महोदय यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसीय ०७ कलमी योजनेतील गुंतवणुकदारास प्रोत्साहन या सदराखाली राज्यातील गुंतवणुकदारांना योग्य ती सुरक्षा पुवून कसे प्रोत्साहन मिळेल याबाबत सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या