![]() |
| जन आवाज न्यूज संपादक.आफरोज अत्तार 8888509003. |
मनमाड :- श्रमिक टपरी धारक संघटना पाकिजा कॉर्नरतर्फे मनमाड नगरपरिषद मुख्य अधिकारी यांना निवेदन द्वारे मागणी करण्यात आली की.स्वछ व सुंदर शहर मनमाड शहर हे आपल्या मनमाड नगर पालीकेचे ब्रीद वाक्य आहे परंतु मनमाड शहरात मालेगाव - नगर राष्ट्रीय महामार्गावर मनमाड शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेले पाकीजा कॉर्नर येथे मनमाड शहरात दाखल होताच सर्वात पहिले निदर्शनास येते ते म्हणजे सार्वजनिक शौचालय संडास आहे, हे मनमाड शहराच्या सुशोभीकरणास जसे चंद्रावर डाग सारखेच मनमाड शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावर डाग झालेले आहे.ते हटविल्या शिवाय आपले मनमाड शहर हे स्वछ व सुंदर शहर मनमाड शहर होणार नाही..?
कारण राजवाडा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे व या स्मारकासमोरच ते सार्वजनिक शौचालय संडास आहे तसेच इंदिरा गांधी शॉपिंग सेंटर जवळ या सार्वजनिक शौचालय संडासाच्या बाजूलाच लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा आहे. हे आपल्या सुंदर मनमाड शहर व स्वछ मनमाड मनमाडच्या सुशोभिकरणास ही बाब शोभणारी नाही तसेच या संडासा मुळे व तेथील होणाऱ्या कचरामुळे भविष्यात कोणतेही घटना होऊन महापुरुषांची
अवमानना होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.?
पाकीजा कॉर्नर येथील सार्वजनिक शौचालय असल्यामुळे नागरिक हे शौचालय बाजूला उघड्यावरच कचरा टाकतात परिणामी कचऱ्या मुळे, डुक्कर, कुत्रे असे मोकाट जनावरे या भागात वाढलेली आहे,
पाकीजा कॉर्नर येथील शहरातील मुख्य द्वार असल्याने, या ठिकाणी. शहरात जैन बांधवांचे धर्म गुरु यांची पद यात्रा येते तसेच मुस्लिम बांधवांची ईद ए मिलाद जुलूस, तसेच हिंदू बांधवांचे राम नवमी रथ यात्रा, गजानन महाराज जयंती,शीख बांधवांचे सालाना जोड मेला यात्रा असे शहराती सर्व धर्माचे विविध धर्मीय यात्रा येत असते तसेच शहरातील महापुरुषांची जयंती देखील सार्वजनिक शौचालय च्या बाजूने रस्त्याने जातात त्यांना देखील दुर्गंधीचा सामना करावा लागतो तसेच शहरातील हिंदू मुस्लिम शीख ईसाई असे सर्व बांधवांची अंतिम यात्रा (मयत) जाताना पाकिजा कॉर्नर मुख्य रस्त्याचा वापर होतो परंतु या अंतिम यात्रांना देखील या सार्वजनिक शौचालय मुळे होणाऱ्या दुर्गधीचा, सामना करावा लागतो,
https://youtu.be/lcUdFsNuO7M?si=ly0lfV8Tb5kHXfVK
👆 व्हिडिओ बातमी बघण्यासाठी या लिंक वर दोन वेळेस क्लिक करा







0 टिप्पण्या