जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.



मनमाड :- नांदगाव तालुक्यात 70% शासनास महसूल देणारे तालुक्यातील सर्वात मोठं असलेले मनमाड शहराच्या नागरिकांना खूप अडचणीचा सामना करावा लागत आहे,
मनमाड शहरात दुय्यम निबंधक वर्ग 1 कार्यालय नसल्याने नागरिकांना आपल्या मिळकत खरेदी विक्री करण्यास नाईलाजाने थेट 25 किलोमीटर लांब नांदगाव येथे जाव लागत होते,

म्हणून शासनाने तर्फे मनमाड नगर परिषद कार्यालयात दर बुधवारी दुय्यम निबंधक, खरेदी विक्री कार्यालय सुरु करण्यात आलेले होते, त्या मुळे (नहीं मामु से नकटे मामु भले ) म्हणत शहरातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता,

परंतु Covid 19 लॉक डाऊन काळात सर्व शासकीय कार्यालय बंद झाल्यामुळे, ते कार्यालय देखील बंद झाले होते.

अनलॉक नंतर सर्व शासकीय कार्यालय सुरु करण्यात आले परंतु मनमाड नगर परिषद कार्यालयातील दर बुधवारी सुरु राहणारे दुय्यम निबंधक वर्ग 1 कार्यालय हे कुठलेही विचार न करता पूर्वरत सुरु करण्यात आले नाही, सदर कार्यालय हे कायमस्वरूपी बंद करण्यात आले,परिणामी नांदगाव तालुक्यातील शासनास 70% एकटे महसूल देणारे मनमाड व शहरातील नागरिकांना गावापासून 25 किलोमीटर लांब नांदगावला जाऊन आपल्या मिळकतीचे खरेदी विक्री करावे लागत आहे, यात मनमाड शहरातील नागरिकांना ना हक आर्थिक भुरदंड फटका बसत आहे, शासनाने लवकरात लवकर मनमाड शहरात दुय्यम निबंधक वर्ग 2 कार्यालय सुरु करावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे,