मनमाड :- मनमाड शहरात एकेकाळी रौद्र रूप धारण करून, भीषण पूरग्रस्त परिस्थिती निर्माण करणारी, रामगुळणा व पांझण नदीची, आज खूप बिकट अवस्था झालेली आहे, मनमाड शहरात पांझण नदीचे आगमन होतांना कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम शाळा जवळ,पांझण नदीत मुबलक पाणी असल्याचे निदर्शनास येते,
तसेच गणेश जल कुंड येथे देखील रामगुळणा व पांझण नदीचे पाणी वाहताना दिसते तसे गुरुद्वारा मागे, ईदगाह पुलाजवळ, व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक पांझण नदी पुला जवळ व देखील पांझण नदीत पाण्याचे प्रमाण दिसते, परंतु, अमरधाम पुला जवळ पांझण नदी ही अचानक गायब झालेली आहे, मनमाड शहरात खळखळून वाहणाऱ्या पांझण नदीचे पाणी हे अडवून उचलण्यात येत असल्याने पांझण नदी ही मनमाड शहरातच गायब झालेली आहे,
परिणामी मनमाड शहरातील हजारो विंधन विहीर बोरवेल हे आटलेले असून, शहरातील अंदाजे पन्नास हजार नागरिकांना या कडक्याच्या उन्हाळ्यात भीषण पाणी समस्यांना समोर जावे लागत आहे, नाईलाजाने 400.500. रु खर्च करून 1000 लिटर पाणी वापरण्यास नागरिकांना विकत घ्यावे लागत आहे, अशी खंत नागरिकांतर्फे व्यक्त करण्यात आलेली आहे,
मनमाड शहरात पांझण नदीचे जसे आगमन होतांना कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम शाळा जवळ,पांझण नदीत मुबलक पाणी उपलब्ध आहे, तशी परस्थिती संपूर्ण शहरात वाहणाऱ्या पांझण नदीची राहिली पाहिजे, तरच शहरातील हजारो विंधन विहीर बोरवेल जिवंत राहतील व नागरिकांना वापरासाठी पाणी विकत घ्यावे लागणार नाही,
कवी रवींद्रनाथ टागोर इंग्लिश मीडियम शाळा जवळ,पांझण नदीत मुबलक पाणी असल्याचे निदर्शनास येते, परंतु अमरधाम पुला जवळ पांझण नदी ही अचानक गायब झाली आहे, म्हणून मनमाड शहरातील पांझण नदी ही चोरीलाच गेलेली आहे, असे नाकारता येणार नाही, मनमाड नगर परिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पांझण नदी चे पाणी चोरी थांबवावी, व शहरात जोरात असलेले पाणी विक्री व्यवसाय /पाणी माफियांचे तर संबंध तर नाही ना,? याची देखील चौकशी करून, योग्य ते उपाय योजना करावे अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात आलेली आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या