Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

उन्हाळ्याचा तडाका लागताच 'या' जातीच्या कलिंगडाला मोठी मागणी.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


मनमाड ता 25 : उन्हाळा सुरू होताच पाणीदार फळ असलेल्या कलिंगडाला मागणी वाढली आहे.'शुगर किंग'ला मोठी मागणी कलिंगडाच्या सेवनाने उन्हाच्या तडाख्यापासून

शरीरातील पाण्याची पातळी वाढते तसेच गारवा मिळतो. लाल बुंद असणाऱ्या टरबुजाचे दर यंदा वाढले असून नगावर आणि किलोच्या दराने बाजारात उपलब्ध आहेत.

कलिंगड हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे, सर्व थरातील लोकांच्या पसंतीस उतरलेले रसदार फळ आहे याला उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते. शहरी व ग्रामीण भागांमध्ये कडक उन्हाळ्यात सतत लागणारी तहान शमविण्यासाठी कलिंगडाचा हमखास उपयोग होताना दिसतो. अशा या वाढत्या मागणीचा विचार करता व कमी खर्चात, कमी पाण्यावर व अल्प कालावधीमध्ये येणारे पीक असल्यामुळे शेतकरी कलिंगडाची लागवड मोठ्या प्रमाणात करतात
कलिंगडमध्ये सुमारे ९० टक्के पाणी असते, जे आपल्याला हायड्रेटेड आणि ताजे ठेवते. कलिंगड खाण्यासाठी देखील चवदार असते. कलिंगडमध्ये  जीवनसत्त्वे, खनिजे आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ आहे. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शहरातील भाजी बाजारासह विविध रस्त्यावर कलिंगडाची विक्री केली जाते रोज १०० ते १२० टन आवक होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कलिंगडांना मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात दर्जानुसार एक 'शुगर किंग' कलिंगड 100 ते 350 रुपयांपर्यंत मिळत आहे.

 बाजारात जिल्ह्यातील विविध भागातून कलिंगडाची आवक होते. उन्हाळा वाढेल तसे ग्राहकांची संख्याही वाढत असते. फ्रूट सलाड आणि ज्यूस बनवण्यासाठी कलिंगडाला मागणी असते.

अशी माहिती व्यापारी कल्पेश शिंवदे यांनी दिली.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या