Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

" डुबते हुए को तीन के का सहारा" दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग, व विधवा महिलांनी नांदगाव तहसील कार्यालयात पेन्शन साठी केली एकच गर्दी

 


"गर्दी टाळण्यासाठी शासनाने निदान दिल्लीतून धोरण ठरवावे, त्रस्त नागरिक,"

मनमाड :- गारपीठ व अवकाळी पावसामुळे झालेले शेतीचे नुकसान, व दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आलेले नांदगाव तालुक्यात मंदीचे सावट आहे, तालुक्यात अशी बिकट परिस्थिती निर्माण होतांना दिसत आहे,या दुष्काळाचा परिणाम तालुक्यातील, संजय गांधी निराधार विधवा व दिव्यांग अर्थसहाय्य योजना,श्रवणबाळ ज्येष्ठ नागरिक अर्थसहाय्य,
योजना,लाभ घेणारे जेष्ठ नागरिक दिव्यांग,व विधवा महिला, यांचेवर देखील झालेला आहे,दिसून येते, 

 आपल्याला मिळत असलेल्या योजनेचा लाभ सुरू रहावा व आपले व आपल्या परिवाराचे उदरनिर्वा कसेतरी सुरू राहावा या साठी, संजय गांधी निराधार विधवा,दिव्यांग अर्थसहाय्य योजना,श्रवणबाळ ज्येष्ठ नागरिक अर्थसहाय्य,योजनेचा लाभ घेणारे, दिव्यांग विधवा महिला, व जेष्ठ नागरिक यांनी आपले कागदपत्रे जमा करून पेन्शन ( पगार खात्यात जमा होण्यासाठी) नांदगाव तहसील कार्यालय येथे तुफान गर्दी केलेली आहे, या गर्दीला बघून तालुका दुष्काळग्रस्त व भीषण आर्थिक टंचाईने ग्रस्त झाल्याचे शक्यता नाकारता येत नाही, 
संजय गांधी निराधार विधवा व दिव्यांग अर्थसहाय्य योजना,श्रवणबाळ ज्येष्ठ नागरिक अर्थसहाय्य,योजनेचा लाभ घेणारे, दिव्यांग विधवा महिला,व जेष्ठ नागरिक यांची कागदपत्र जमा करण्यासाठी व पेंशन साठी ही भली मोठी रांग बघून "डुबते हुए को तीनके का सहारा" असेच म्हणावे लागेल,
या वेळी, "गर्दी टाळण्यासाठी शासनाने निदान दिल्लीतून धोरण ठरवावे, असे उपस्थित त्रस्त लाभार्थी नागरिकांतर्फे प्रतिक्रिया देण्यात आले, जन आवाज न्युज, मनमाड,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या