Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

राजकारणी लोक हुशार असतात अस काही नाही.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.


राजकारणी लोक हुशार असतात अस काही नाही.यांना त्याच दुःख कधीच नसतं किंवा यापुढेही नसणार कारण हे फकत जनतेला व तुमच्यासारख्या सामान्य माणसाला वाटतं ही लोक खूप पुढच्या तयारीची असतात. यांना त्यातले काही कळत नाही यांना जनतेला कसं अंधारात ठेवायचे व एकमेकात कसे भांडत ठेवायचे हे खूप जास्त कळत . आपण एकमेकात भांडतो व हे तिकडे आतल्या बाजूने खूप खुश असतात कारण काही केलं तर सत्ता त्यांच्याच हातात आहे. तू रडल्यासारख कर मी हसल्या सारखं करतो. अस हे सत्ता टिकवण्यासाठी करतात व आपल्या हातात गाजर देतात. यांना समाजात काय समस्या आहेत त्या कश्या सोडवाव्यात याच सगळं कळतं असतं पण ते समस्या कधीच सोडविणार नाहीत. कारण समस्या नसेल तर लोक त्यांच्याकडे येणार नाहीत. व त्यांना त्याच राजकारण करता येणार नाही. हे असं सगळं चालू आहे. 

खूप बेकार आहे हे सगळे त्यामुळे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाने फक्त मतदान करताना त्यातल्या त्यात भ्रष्टाचार करणार नाही असे व्यक्तीला 5 वर्षासाठी कसे निवडून देता येईल ते बघावे. इतर वेळेला फक्त हे कसे भांडतात हा तमाशा बघावा व आनंद घ्यावा आपल्या आपल्यात भांडून काही उपयोग नाही. आपल्या दररोज च्या जीवनात कोणीही सत्तेवर आला तर काहीही फरक पडत नाही. आपल्याला जी मेहनत व कष्ट करावे लागते यामध्ये काहीही फरक पडणार नाही. त्यामुळे जो निवडून येेईल तो 5 वर्षासाठी आपलाच आहे असे समजावे. कुणालाही दोष देत बसू नये. कारण त्यामुळे समस्या काही सुटणार नाहीत. समस्या सोडवण्यासाठी जोपर्यंत समाजातले सुशिक्षित व प्रामाणिक लोक आपण निवडून देणार नाहीत तोपर्यंत हे असेच चालणार. राजकारण हे खूप चांगलं आहे. पण जो पर्यंत करप्ट लोकांच्या हातात ते आहे त्यापर्यंत काहीही होणार नाही. त्यामुळे कोणा एका राजकीय व्यक्तीला दोष देवून चालणार नाही. तर चांगले व सुशिक्षित लोक राजकारनात कसे निवडून येतील याकडे सामान्य माणसाने बघितले पाहिजे. त्यावर चर्चा झाली पाहिजे व आजच्या तरुणांनी व सामजिक संस्थांनी सामान्य जनतेला राजकारण म्हणजे काय हे लोकांना कळेल या भाषेत भाषेत समजावले पाहिजे त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी मतदान केले पाहिजे त्यासाठी लोकांचे प्रबोधन केले पाहिजे कारण काय होतंय फक्त 50 ते 60 टक्के मतदान होतंय व ज्याला 10 टक्के मतदान पडेल असा 10 टक्के लोकांनी निवडून दिलेला व्यक्ती 100% लोकांचे प्रतिनिधी करतोय ही एक प्रकारे लोकशाहीची थट्टा आहे. हे जोपर्यंत आजच्या तरुणाला व तुमच्या आमच्या सारख्या सामन्याला कळत नाही. आज गावोगावी गट तटाचे राजकारण चालू ते न होता गावच्या समस्या सोडवण्यासाठी सर्व हेवेदावे सोडून एकत्र आले पाहिजे व पूर्ण गावाने एकच त्यातल्या त्यात बरा नेता किंवा गावच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येवून मतदान केले पाहिजे . पण काय होत आहे एका गावात एका भावकित व एका घरात सुद्धा 4 पक्षाचे लोक आहेत ते आपसात वेगळ्या पक्षात राहून उगीच लढत आहेत व आपल्याच पायावर धोंडा मारून घेत आहेत.आणि याचाच फायदा करप्ट राजकारणी बरोबर उचलत आहेत. बाप एका पक्षात आई दुसऱ्या पक्षात मुलगा तिसऱ्या पक्षात मुलगी चौथ्या पक्षात जवाई पाचव्या पक्षात कुणीही निवडून आली तरी सत्ता त्यांच्या घरात राहत हे जोपर्यंत तुमच्या आमच्या सारख्या सामन्याला कळत नाही तो पर्यंत समस्या आहेत त्या तश्याच राहणार आहेत आपण फक्त आपल्याच लोकांची डोकी फोडणार व आपण आपसात भांडत बसणार व हे तिकडे मुंबई व दिल्लीत सत्तेचा मलिदा खात राहणार . तर हे सर्व असे आहे. या ग्रुप च्या माध्यमातून एका जरी व्यक्तीने एका त्याच्या स्वतः च्या गावात किंवा दुसऱ्याच्या गावातील सामान्य लोकांना व कार्यकर्त्यांना एकत्र आणून गावात जरी एकमत आणले तरी खूप चांगली सुरुवात होईल. त्यासाठी ग्राम पंचायत मधील राजकारण विसरून सर्वांना किवा जास्तीत जास्त लोकांना एकत्र आणून गावातील मते जरी एक गठ्ठा एकाच राजकीय पक्षाला किंवा एकाच व्यक्तीला कशी पडतील यावर भर दिला तर तो खरा लोकशाही चा व हा गट स्थापन करण्या मागचा उद्देश सफल होईल. एका एका गावाचा विचार केला पाहिजे. उगीच मोदी काय बोलतोय पवार काय बोलतोय यावर आपले मत ठरवू नका आपला गाव काय बोलतोय गावातील तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुण काय बोलतोय . गावातल्या तरुण सुशिक्षित बेरोजगार तरुणांना एकत्र आणून त्यांच्या समस्या कश्या सोडवता येतील त्यांना नोकऱ्या व रोजगार कसा मिळवता येईल यावर चर्चा झाली पाहिजे व त्यांना त्यासाठी कोण नेता मदत करणार आहे. नाहीतर जो पुढारी एखाद्या मंदिर किंवा समाज हॉल ला मदत करील त्याला मत देवून काय उपयोग मंदिर व समाज हॉल बांधून काय किती तरुणांना रोजगार मिळाला उलट त्यामधे ज्याला कॉन्ट्रॅक्ट भेटेल तो त्यात पैसा कमावणार हे नको गावात किंवा भागात एकदा उद्योग सुरू करण्यासाठी कोणी पुढारी पंतप्रधान योजनेतून 10 ते 20 कोटी चा प्रकल्प घेवून येणार आहे का किंवा तसा प्रयत्न चालू आहे का. गावात एखादी शाळा, पतसंस्था , दवाखाना , पापड उद्योग, साबण निर्मिती उद्योग, दूध प्रकिर्या उद्योग, दररोज च्या जीवनात लागणाऱ्या वस्तू चे निर्मिती उद्योग जसे की कोलगेट, मीठ, मसाला, धान्यावर प्रकिर्या करणारे उद्योग जसे की सुगीमध्ये आपल्या कोल्हापुरात खूप सारे रताळे व सोयाबीन उत्पादन केले जाते ते खूप कमी किमतीत व्यापाऱ्याला विकावे लागते पण गावातच त्यावर प्रकिऱ्या करणे उद्योग एखाद्या शेतकऱ्यच्या मुलाचे उद्योग असेल किंवा सहकारी तत्त्वावर आधारित प्रकल्प राबवणार असेल तर व यासारखे 

 यासारखे प्रकल्प राबवणार आहे का की ज्यामध्ये गावातील काही तरुणांना रोजगार मिळेल. खूप काही विचार करण्यासारखे आहे. पण आपण त्यावर चर्चा न करता हा पुढारी काय बोलला तो कुठल्या पक्षात गेला त्याने किती खोके खाल्ले असतील यावर उगीच भांडत बसतोय . हे कुठेतरी थांबायला हवे.धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या