मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सक्तीची वसूल केलेली फी तात्काळ  परत करावी , अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिमशक्ती विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष दिपक अंभोरे यांनी दिला आहे

नांदगाव.मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सक्तीची वसूल केलेली फी तात्काळ  परत करावी , अशा मागणीचे निवेदन भिमशक्ती विद्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष दिपक अंभोरे व काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष मनोज चोपडे यांनी गटशिक्षणाधिकारी चिंचोलेसाहेब यांना दिले असून सदर मागणी ही न्याय्य स्वरूपाची असून महाविद्यालयीन व माध्यमिक शालेय संस्था ह्या शालेय विद्यार्थ्यानं कडून राजरोसपणे फी वसुली करीत आहे, महाराष्ट्र सरकारने नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करून देखील विद्यार्थ्यांकडून पेपर फी , संगणक फी,वसुली अशा नावा खाली फी वसुली शालेय संस्था करीत आहे , फी भरली नाही तर पेपरला बसू दिले जाणार नाही, अशी धमकी देऊन फी वसुली शालेय संस्था करीत आहे, सदर बाब ही फार गंभीर स्वरूपाची असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे, महाविद्यालयीन व शालेय संस्था यांनी विद्यार्थ्यांकडून सक्तीची वसूल केलेली फी तात्काळ परत करावी अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भिमशक्ती विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष दिपक अंभोरे यांनी दिला आहे.