 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003. |
दिलेला मार्ग सोडून,वेगळेच दिशेच्या मार्गाने एस टी निघाली, नांदगाव परिवहन विभागाची तारांबळ उडाली.
नांदगाव: आज दिनांक 12.1.2024 नांदगाव आगाराची एस टी नांदगाव परळी वैजनाथ ही बस चुकीच्या मार्गाने गेल्याचे निदर्शनास आले सदरची बस नांदगाव येथून नगरसुल पर्यंत नियोजित मार्गाने आली आणि नगरसुल पासून चुकीच्या मार्गाने म्हणजे नगरसुल मातुलठाण बल्लेगाव नागडे येवला अशी गेली याबाबत माहिती होताच, आगारातर्फे सदर एसटीचा पाठलाग करून येवला एसटी बसस्थानकावर चालकाला जाब विचारण्यात आले की,
एस टी मातुलठाण बल्लेगाव नागडे या गावाहून कशी आली.?तर यावर डोकं भिन्न करून चक्कर येणारे उत्तर चालकाने दिले,
दिलेल्या मार्गांवर 2 रेल्वे गेट लागतात हे योग्य आहे का.?
असे उलट प्रश्न चालकतर्फे नांदगाव परिवहन विभागालाच विचारण्यात आले,
याबाबत निर्भय महाराष्ट्र पार्टी संपर्कप्रमुख हिरालाल हरी घुगे यांनी एसटी डेपो मॅनेजर यांना याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली व नांदगाव परळी वैजनाथ ही एस टी कायमस्वरूपी नांदगाव नगरसुल मातुलठाण बल्लेगाव नागडे येवला कोपरगाव या मार्गाने सुरू करावी अशी मागणी केली, या बस चालकावर नांदगाव एसटी डेपो मॅनेजर काय कार्यवाही करतात व खरोखर सदर बस चा मार्ग लोकांच्या मागणीनुसार नांदगाव नगरसुल मातुलठाण बल्लेगाव नागडे येवला कोपरगाव असा करतात यावर नागरिकांचे लक्ष लागून आहे, परंतु दिलेला मार्ग सोडून,वेगळेच दिशेच्या मार्गाने एस टी निघाली,या वर नांदगाव परिवहन विभागाची तारांबळ उडाली हे मात्र नक्की,
0 टिप्पण्या