Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

महाराष्ट्राची दुरावस्था सर्वाधिक, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या!

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003.

महाराष्ट्राची दुरावस्था सर्वाधिक, महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या! 

 मुंबई - 06 डिसेंबर :गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. महाराष्ट्रातच एका वर्षात २२,७४६ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये १९,८३४ लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्जबाजारीपणाच्या विळख्यात अडकून आणि दिवाळखोरीमुळे आत्महत्या करणा-यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अहवालातून ही धक्कादायक आणि लाजिरवाणी आकडेवारी उघड झाली आहे.

राज्यात दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे १९४१ आत्महत्या झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यानंतर कर्नाटकात १३३५ आणि आंध्र प्रदेशात ८१५ जणांनी दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या. राज्यात बेरोजगारीमुळे ६४२, गरिबीमुळे ४०२ आणि व्यावसायिक जीवनातील समस्यांमुळे ६४० नागरिकांनी आपले आयुष्य संपवले आहे.

राज्यात कौटुंबिक समस्यांमुळे आत्महत्या करणा-यांची संख्या सर्वाधिक असल्याची बाबही निदर्शनास आली आहे. गेल्या वर्षभरात कौटुंबिक कारणांमुळे जवळपास ६९६१आत्महत्या झाल्याचे अहवाल सांगतो. महाराष्ट्र, तामिळनाडू, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांमध्ये मिळून देशातील एकूण आत्महत्यांपैकी ४९.३ टक्के आत्महत्या झाल्याचे धक्कादायक वास्तवही समोर आले आहे.

गंभीर आजारही आत्महत्येचे एक महत्वाचे कारण आहे. देशभरातील १८.४ टक्के आत्महत्यांमागे गंभीर आजार हे कारण होते. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रोगामुळे होणा-या आत्महत्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. अंदमान आणि निकोबार बेटे, पंजाब, तामिळनाडू, सिक्कीम आणि गोवा या राज्यांमध्ये रोगामुळे आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या