 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 |
महावितरण मधील लाईनस्टाप कर्मचाऱ्यांचे ज्वलंत प्रश्न निकाली काढावे.!
लाईनस्टाप कृती समितीचे आमदार आशुतोष काळे यांना निवेदन
महावितरणच्या लाईनस्टापचे विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाप बचाव कृती समितीच्या वतीने कोपरगांव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांना देण्यात आले.
महावितरण मधील वर्ग 4 ची नोकरीतील इंट्रीपोस्ट कायम ठेऊन वर्ग 4 शैक्षनिक अर्हता प्राप्त लाईनस्टाप कर्मचाऱ्यांचे वर्ग 3 मध्ये वर्गीकरण करण्यात यावे, यापूर्वी रद्द पदे पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. महावितरण कंपनीतील लाईनस्टाप कर्मचारी यांचे कामाचे तास व स्वरूप निश्चित करण्यात यावे.
महावितरण कंपनीतील लाईनस्टाप कर्मचाऱ्याना मागील पगारवाढ करारात नमुद असल्याप्रमाणे फरकासह वाढीव पेट्रोल भता 20 लिटर देण्यात यावा. महावितरण मधील लाईनस्टाप यांना स्वतंत्र वेतन श्रेणि देण्यात यावी.सुरक्षित साधने व लाईन दुरुस्तीसाठी योग्य ते साहित्य पुरविण्यात यावे.आदी मागण्याचे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य वीज महामंडळ ते महावितरण कंपनी पर्यंतचा कार्यकाळ पहाता जे तळागाळात कार्यरत असणारे लाईनस्टाप महावितरण चा कणा म्हणून ओळख असणारे कर्मचारी यांच्या सोबत जोडलेले ज्वलंत प्रश्न बाबत ठोस निर्णय अद्याप झालेला नाही, व या श्रेणीवर अन्याय होत आहे.
महाराष्ट्र राज्य वीज लाईनस्टाप बचाव कृती समिती मार्फत 9 संघटना व अभ्यास वर्गाने या अन्याया विरोधी आंदोलन नोटीस दिली आहे. महावितरण प्रशासन स्तरावर 3 बैठका अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक व संचालक मानव संसाधन स्तरावर चर्चा झाली, परंतु चर्चेत लेखी स्वरूपा मध्ये कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने महाराष्ट्रतील लाईनस्टाप मध्ये असंतोष पसरला आहे.लाईनस्टाप बांधवांचे ज्वलंत प्रश्न मार्गी लागावे हे स्वप्न आहे ते पुर्ण होई पर्यंत लाईनस्टाप शांत बसणार नाही.
विधायक मार्गानें लाईनस्टापचा लढा सुरू राहणार आहे, तमाम लोकप्रतीनिधीनी यावर चर्चा घडवून आम्हास न्याय द्यावा अशी अपेक्षा लाईनस्टाप ने व्यक्त केली आहे. यावेळी सिताराम खंडागळे, अनिरुद्ध पगारे, प्रविण कोळी, शाम ओढेकर, खंडू सारुकते,धनंजय बंद्रे, रामलिंग दुधाणे, रामेश्र्वर जपे,आत्माराम कोळसे, प्रविण सानप, अतुल वणकर, राकेश कांबळे, किरण सैद, नवनाथ जाधव आदींनी निवेदन दिले.
0 टिप्पण्या