Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड नगरपरिषदेकडून दरवाढ प्रशासकीय ठराव. क्र. 146 रद्द करा अन्यथा प्रशासनाविरुध्द शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलनाचा इशारा.मा.माधव शेलार.

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003.

मनमाड शहर हे नांदगाव तालुक्यातील अतिशय महत्त्वाचे कामगार वस्तीचे शहर असून शहराची लोकसंख्या १.५ लाखापेक्षा जास्त आहे. मनमाड नगरपरिषदेकडून नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना विविध दाखले / उतारे पुरविले जातात व त्याबद्दल फी आकारली जाते तसेच काही सेवा या निशुल्क देखील आहेत. सदर सेवांबाबत नागरिकांतर्फे आकारण्यात येणारी फी ही बऱ्याच वर्षापासून निश्चित करण्यात आलेली असून ती योग्य व शहरातील सर्वसामान्यांना परवडणारी आहे. मात्र मनमाड नगरपरिषदेने शहरातील जनतेच्या आर्थिक परिस्थिती व नगरपरिषदेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सेवांचा दर्जा याचा आढावा न घेता फक्त मनमाड नगरपरिषदेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोनातून दि. १५/०९/२०२३ रोजी प्रशासकीय ठराव क्र. १४६ नुसार नगरपरिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधांच्या दरात सुधारणा करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये काही सुविधांच्या दरात ५ पट ते १० पट वाढ करण्यात आली असून काही सुविधा निशुल्क असतांनाही त्यामध्ये नवीन दर आकारणीनुसार फी आकारण्यात येणार आहे.  मनमाड नगरपरिषदेकडून दिल्या जाणाऱ्या

सेवांचे नवीन दर हे अवाजवी व चुकीचे आहे. तसेच शहरातील सर्वसामान्य जनतेवर आर्थिक बोजा वाढविणारे आहे. मनमाड नगरपरिषद उत्पन्नाच्या दृष्टीकोनातून शहरातील नागरिकांकडून नियमितपणे पाणीपट्टी, घरपट्टी व गाळापट्टी वसुल करीत असते तसेच घरपट्टी जमा करण्यास विलंब झाल्यास व्याजासह विलंब फी देखील आकारते मात्र त्या मोबदल्यात नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यास मात्र नगरपरिषद दुर्लक्ष करते, उपरोक्त दरवाढ ही फक्त मनमाड नगरपरिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे शहरातील सर्व जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन मनमाड नगरपरिषदेने दि. १५/०९/२०२३ रोजी प्रशासकीय ठराव क्र. १४६ नुसार नगरपरिषदेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवांचे नवीन दरपत्रक तात्काळ रद्द करण्यात यावे अन्यथा मनमाड शहरातील समस्त जनतेला सोबत घेवून मनमाड नगरपालिका प्रशासनाविरुध्द तीव्र आंदोलन करण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या परिणामास सर्वस्वी नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील असा इशारा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे देण्यात आले आहे

प्रशासकीय ठराव कॉपी चे फोटो  टाकलेले आहे



.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या