Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नगर परिषद शाळा क्र.10 मनमाड मध्ये डाॅ.बाबासाहेबआंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.

 
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क.8888509003

नगर परिषद शाळा क्र.10 मनमाड मध्ये डाॅ.बाबासाहेबआंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा.

मनमाड विशेष प्रतिनिधि:अनिस शेख.  नगर परिषद शाळा क्रमांक 10 मनमाड मध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण(६७)वा दिन साजरा करण्यात आला. प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.सुनिल सांगळे यांनी पुष्पहार अर्पण करून अध्यक्षस्थान स्विकारले.

       कार्यक्रम प्रसंगी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण,शिक्षण,समाजकार्य तसेच राज्यघटना तयार करण्यासाठी असलेले योगदान याविषयी विचार श्री.एस. एस. नाईकवाडे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमास श्री. प्रमोद दौलतराव पाचोरकर यांनी शुभेच्छा दिल्या.

    पालकवर्ग अनुक्रमे सौ.दिपाली वाघ,सौ.रूपाली भिवसनेसौ.संध्याताई कांदळकर.सौ.रोहिणी सोनवणे. पुजा प्रकाश आहिरे. श्री. नितीन शिक्केनिस व सौ.लिलावती शिक्केनिस. श्री.देवेंद्र पवार तसेच शालेय शिक्षकवर्ग अनुक्रमे श्री.एस.एस नाईकवाडे मुख्याध्यापक व श्रीमती.वाय.एस. आहिरे आदि मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या