 |
| जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003 |
13 ऑक्टोंबर मुक्तीभुमी येवला करीता मनमाड बस आगारातून जादा बस सोडण्यात यावे रिपाई तर्फे मागणी.
येवला येथे.13 ऑक्टोंबर 1935 रोजी येवला येथे धर्मांतराची घोषणा केली होती त्या स्थळाला 'मुक्तीभूमी' म्हणून आज सर्व भारतात प्रसिध्द आहे. सदर धर्मांतर घोषणेचा 84 वा. वर्धापन दिन असून याठिकाणी संपूर्ण भारतातील आंबेडकरी अनुयायी याठिकाणी वंदन करण्यासाठी येत असतात. तेव्हा मनमाड व परिसरातील मोठ्या प्रमाणात बौध्द अनुयायी येवला मुक्तीभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनासाठी मोठ्या प्रमाणात जमा होत असतो तसेच अनेक आंबेडकरी नेते मंडळी देखील याठिकाणी सभा घेतात व मोठ्या प्रमाणात यात्रेचे स्वरुप याठिकाणी असते. मनमाड व परिसरातील बौध्द अनुयायी येवला येथे जाण्यासाठी त्यांना सोय व्हावी म्हणून मनमाड आगारातून येवल्याकडे जादा बसची सोय उपलब्ध करून मनमाड येवला फेऱ्या वाढवाव्या. तसेच जादा बसेच चे नियोजन केल्याबद्दल जनतेला माहिती द्यावी जेणे करुन महामंडळाचे देखील उत्पन्न वाढेल व नागरीकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल. असे निवेदन रिपाइं तर्फे देण्यात आले यावेळी युवा तालुका अध्यक्ष गुरु कुमार निकाळे, शहर सचिव. ऍड प्रमोद आहिरे व इतर पद अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या