Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नाशिकात भरणार भ्रष्टाचारी लोकसेवकांच्या फोटो चे प्रदर्शन


 नाशिकात भरणार भ्रष्टाचारी लोकसेवकांच्या फोटो चे प्रदर्शन 

जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.

गेल्या 6 महिन्यात नाशिकमध्ये आजपर्यंत 119 लाच खोर कर्मचारी ACB ने रंगेहाथ पकडले,  परंतु अनेक राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांचे सुद्धा हात काळे असल्याने  भ्रष्टाचारावर सर्व च मूग गिळून गप्प असल्याचे चित्र आहे.  .. 
 कोणीही या विषयावर बोलायला तयार नाही.  

प्रशासन सुद्धा कोणतेही ठोस पावले उचलतांना दिसत नाही,   परिणामी  अजूनही  सर्व सामान्य नाशिककरांची पिळवणूक, छळवणूक, अडवणूक सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांकडून सुरूच आहे,  सर्वत्र भ्रस्टाचारींचा सुळसुळाट सुरु झाला आहे...  या विषयी नाशिककारांमध्ये अतिशय संताप असून नाशिक करांच्या भावना जाणून घेतल्या नंतर निर्भय महाराष्ट्र पार्टी चे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांनी भ्रष्टाचार मुक्त नाशिक जनसंग्राम चा नारा देऊन, भ्रष्ठाचार मुक्त व्यवस्था करण्याचा विडा उचलला आहे, आणि त्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी  सर्वोतोपरी प्रयत्न करेल असे सांगितले.. 

 या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून,  भ्रष्टाचाराला लगाम लागण्यासाठी तसेच सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधून काहीतरी ठोस निर्णय होण्यासाठी आणि भ्रष्टाचार मध्ये सापडलेल्या लोक सेवकांवर कठोर कारवाई होण्याच्या दृष्टीने निर्भय महाराष्ट्र पार्टी, महाराष्ट्र च्या वतीने या सर्व भ्रष्टाचार्यांच्या फोटो चे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे..दि. 9 आणि 10 सप्टेंबर 2023सकाळी 10 ते संध्याकाळी 8 यशवंत नगर, मुंबई नाका नाशिक.  या प्रदर्शनाला जास्तीत जास्त नाशिककरांनी उपस्थित राहून भ्रष्टाचार मुक्त नाशिक करण्यासाठी सहकार्य करावे.  असे आवाहन करण्यात आले आहे निर्भय महाराष्ट्र पार्टी तर्फे भ्रष्टाचार मुक्त नाशिक  जणसंग्राम संस्थापक अध्यक्ष - जितेंद्र भावे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या