सरकारी मोरी,पण नागरिकांना वापरण्यास का चोरी,?
जन आवाज न्यूज संपादक आफरोज अत्तार.8888509003.
येवला.तहसील कार्यालय येवला येथील महिला प्रसाधनगृह हे सर्व महिलांसाठी सार्वजनिक असून सदर महिला प्रसाधनगृहास कुलूप लावून ठेवल्या जात असल्याबाबत तसेच ते तत्काळ खुले करण्याबाबत मी दि. २९/८/२०२३ रोजी आपले सरकार पोर्टल वर ऑनलाईन तक्रार नंबर Dist / CLNS / 2023/9074 नुसार तक्रार दाखल केली होती.
सदर तक्रारीचे अनुषंगाने मा. तहसिलदार साहेब, येवला यांचेकडील
पत्र क्र/आस्था/ कावी/ ३८२/२०२३ दि. ०७/०९/२०२३. प्राप्त ईमेल -८/९/२०२३ रोजी प्राप्त झाले आहे. सदर पत्राचे बारकाईने अवलोकन केले असता तहसील कार्यालय, येवला व भूमी अभिले कार्यालय येवला येथील महिला कर्मचारी, तहसील कार्यालयाती महिलांनी कुलूप लावले असले बाबत सिद्ध झालेले असून प्रसा गृह अभ्यागत / सर्वसामान्य महिलांसाठी खुले करण्याबाबत अडच निर्माण करत आहे. तसेच सदर महिला प्रसाधनगृह खुले ठेवण्याच त्यांची भूमिका दिसत नाही.
करिता सर्वसामान्य महिलांसाठी तहसील कार्यालय येवला येथील प्रसाधनगृह तात्काळ खुले करावे. तसेच त्या ठिकाणी पुन्हा कोणत्याही प्रकारचे कुलूप लावू नये. व ज्या महिला कर्मचारी याबाबत अडथळा निर्माण करतील त्यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून गुन्हे दाखल करणेबाबत आपले स्तरावरून तहसिलदार श्री. आबा महाजन साहेब येवला यांना सक्त ताकीद / सूचना देण्यात याव्यात. तसेच महिला प्रसाधनगृह स्वच्छ कसे राहील.
याबाबत स्वच्छता कर्मचाऱ्यांना निर्देशित करावे. कारण तहसील कार्यालयात येणारी जनता ही मालक आहे आणि कर्मचारी सेवक आहेत. मालकाला अशी वागणूक आपण देऊ शकत नाही याबाबत देखील कर्मचारी महिलांची कान उघाडणी करावी, आणि जर याबाबत तत्काळ कारवाई झाली नाही तर निर्भय महाराष्ट्र पार्टीचे प्रमुख मा. जितेंद्र भावे सरांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय येवला या ठिकाणी फेसबुक लाईव्ह करून आंदोलनाचा मार्ग अवलंबू याची नोंद घ्यावी.
सोबत तहसीलदार येवला यांचे कडील ईमेल वर प्राप्त झालेले पत्र - पाठविले आहे.
0 टिप्पण्या